इस्लामाबाद – आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान (Pakistan Economic crisis) आता जागतिक पातळीवरही एकटा पडताना दिसतो आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं वाढतं महत्त्वानेही पाकिस्तानच्या छातीत धडकी भरली आहे. काही दिवसांपूर्वी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Dival ) यांचा मॉस्को दौरा आणि त्यात डोवाल यांना मिळालेलं महत्त्व यामुळं पाकिस्तानची भीती वाढल्याचं मानण्यात येतंय. अफगाणिस्तानच्या संदर्भात झालेल्या बैठकीत सामील होण्यासाठी डोवाल मॉस्कोत दाखल झाले होते. या बैठकीत रशिया, चीन, इराण, उजबेकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि कजाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सहभागी झाले होते. या बैठकीत सामील होण्यास पाकिस्तानचे नकार दिला होता. या बैठकीत डोवाल यांना हे महत्त्व देण्यात आलं, त्यामुळं पाकिस्तानला चांगलाच पोटशूळ उठलेला दिसतोय.
अफगाणिस्तानाबाबत झालेल्या या बैठकीत भारत सामील झाल्यानं पाकिस्तानचं टेन्शन वाढल्याचं मानण्यात येतंय. अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार आल्यानंतर, भारताशी त्यांचे संबंध बिघडतील अशी आशा पाकिस्तानला होती. प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडतं आहे. पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यातच तालिबानच्या सत्तेनंतर वाढ झाली आहे. अफगाणिस्थानसमोर असलेल्या आव्हानात मदतीसाठी भारत पुढाकार घेताना दिसतो आहे. या सर्व घडामोडी पाकिस्तानसाठी विपरीत मानण्यात येतायेत. यामुळं पाकिस्तानची चिंता वाढली आहे.
भारताच्या या पुढाकाराबाबत पाकिस्तानातील उचभ्रू लक्ष ठेवून आहेत. पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन उद्योगपती साजिद एन तरार यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, अजित डोवाल हे आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर आहेत. अमेरिकेकडून सैन्याची ताकद मिळते आहे. इंग्लंडकडून त्यांना दहशतवादविरोधी लढ्याला बळ मिळालंय. त्यानंतर डोवाल मॉस्कोत अफगाणिस्थानच्या चर्चेते सहभागी झालेत. पाकिस्तानात सध्या कुणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नाही. पाकिस्ताननं या बैठकीत सामील होण्यासही नकार दिलाय. हेच पाकिस्तानचं भविष्य आहे का?
ही बैठक इतकी महत्त्वाची होती की, या सगळ्या देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची प्रोटकॉल मोडत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी भेट घेतली. या बैठकीत डोवाल हे इंग्लंड आणि अमेरिकेच्या दौर्यानंतर पोहचले असल्यानं पुतिन यांनी त्यांची विशेष भेट घेण्यासाठी हे सगळं केल्याचं मानण्यात येतंय. युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीमुळं रशिया आणि युरोपीय़ देशात अद्यापही ताणावाची स्थिती आहे. अमेरिका आणि इंड्लंडबाबत रशियाची भूमिका अद्यापही तणावाचीच आहे. अशात भारतानं या युद्धात तटस्थ भूमिका घेतली आहे. पंतप्रधान मोदींनी युद्ध हे समस्येचं समाधान नाही, असा सल्लाच पुतिन यांनाही दिला आहे. या सगळ्यात भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची पुतिन यांनी घेतलेली विशेष भेट ही जागतिक पातळीवर भारताची उंची काय आहे, हे दाखवण्यासाठी पुरेसं आहे.
फक्त इतकंच नाही तर भारत हा रशिया आणि पाश्चिमात्य देशांत मध्यस्थी करण्याच्याही तयारीत असल्याचं मानण्यात येतंय. यासाठी भारतात होणारं जी-20 संमेलन हे महत्त्वाचं स्थान ठरु शकतं. यासाठी भारत चीन, रशिया आणि अमेरिका या तिन्ही महासत्तांशी समन्वयाच्या भूमिकेत दिसतो आहे. भारत आणि चीन यांच्य़ात जरी तणावाची स्थिती असली, तरी रशिया आणि चीन यांच्यातील मैत्रीचे संबंध भारताच्या पथ्यावर पडणारे आहेत. दुसरीकडे अमेरिका आणि चीन यांच्यात संबंध चांगले नसले तरी भारताशी अमेरिकेचे असलेले संबंध मात्र चांगले आहेत.