DA मध्ये ३ टक्क्यांची वाढीची घोषणा; केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, यावेळी सरकार दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी ही खास घोषणा करणार आहे. यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सणासुदीच्या काळात अतिरिक्त फायदेदेखली मिळणार आहेत.
केंद्र सरकार वर्षातून दोनदा डीए वाढवते. होळीपूर्वी पहिली दुरुस्ती (जानेवारी-जूनसाठी) दिवाळीपूर्वी दुसरी दुरुस्ती (जुलै-डिसेंबरसाठी). गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४ मध्ये सरकारने दिवाळीच्या सुमारे २ आठवडे आधी डीए वाढवण्याची घोषणा केली होती. या वर्षी दिवाळी २०-२१ ऑक्टोबर २०२५ रोजी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर, कर्मचाऱ्यांसाठी हा एक सणाची भेट म्हणून विचार केला जात आहे.
महागाई भत्ता ७ व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत औद्योगिक कामगार ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या आधारे मोजला जातो. त्याचे सूत्र १२ महिन्यांच्या CPI-IW सरासरीवर आधारित आहे. जुलै २०२४ ते जून २०२५ पर्यंत, CPI-IW सरासरी १४३.६ होती, ज्या अंतर्गत महागाई भत्ता ५८ टक्के झाला आहे. म्हणजेच, आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढून ५८ टक्के होईल, जो आर्थिक आघाडीवर लाखो कुटुंबांना मोठा दिलासा देऊ शकतो आणि उत्सवाच्या हंगामात भेट म्हणूनही असू शकतो.
गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ कोटींना घातला गंडा
महागाई भत्ता वाढल्यानंतर, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ वेतन ५०,००० रुपये असेल, तर पूर्वी त्याला ५५ टक्के दराने २७,५०० रुपये मिळत होते. डीए लागू झाल्यानंतर ते २९,००० रुपये होईल. म्हणजेच दरमहा सुमारे १५०० रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळेल. सध्या ही डीए वाढ कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना अल्पकालीन दिलासा देऊ शकते, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे, परंतु खरा बदल आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर दिसून येईल.






