Huawei Mate XTs: आता राडा तर होणारच! Huawei घेऊन आली जगातील दुसरा ट्राय फोल्ड स्मार्टफोन, लाखोंच्या घरात किंमत आणि असे आहेत फीचर्स
तुम्हाला आठवतंय का जगातील पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन कोणत्या कंपनीने लाँच केला होता? Huawei या कंपनीने जगातील पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन Huawei Mate XT लाँच केला होता. कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केल्यानंतर सर्वचजण चकित झाले होते. आता पुन्हा एकदा या कंपनीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कंपनीने जगातील दुसरा ट्राय फोल्ड स्मार्टफोन लाँच केला आहे. चीनमध्ये अलीकडेच जगातील दुसरा ट्राय फोल्ड स्मार्टफोन Huawei Mate XTs लाँच करण्यात आला आहे.
नवीन स्मार्टफोनमध्ये HarmonyOS 5.1 आउट-ऑफ-द-बॉक्स मिळतो, तसेच या डिव्हाईसमध्ये 5,600mAh बॅटरी दिली आहे, जी वायर्ड, वायरलेस आणि रिवर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये 50-मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. ज्यामध्ये अल्ट्रावाइड आणि पेरिस्कोप लेंस समाविष्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये नवीन Tiangong डुअल-हिंज डिझाईन आहे, मात्र यामध्ये डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंस सर्टिफिकेशन देण्यात आले नाही. (फोटो सौजन्य – X)
चीनमध्ये Huawei Mate XTs सुरुवातीची किंमत CNY 17,999 म्हणजेच सुमारे 2,22,300 रुपये ठेवण्यात आली आहे, ही किंमत 16GB + 256GB व्हेरिअंटसाठी आहे. तर स्मार्टफोनच्या 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 19,999 म्हणजेच सुमारे 2,47,100 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 21,999 म्हणजेच सुमारे 2,71,900 रुपये ठेवण्यात आली आहे. हा हँडसेट ब्लॅक, पर्पल, रेड आणि वाइट कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन चीनमधील ई-स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
नवीन Huawei Mate XTs मध्ये 6.4-इंच सिंगल-मोड स्क्रीन आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2,232×1,008 पिक्सेल आहे. या डिव्हाईसमध्ये 7.9-इंच डुअल-मोड डिस्प्ले आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2,232×2,048 पिक्सेल आहे. जेव्हा हा स्मार्टफोन पूर्णपणे उघडला जातो तेव्हा हा फोन 10.2-इंच फोल्डेबल डिस्प्लेसह येतो, ज्याचे रेजोल्यूशन 2,232×3,184 पिक्सेल आहे. फोनमध्ये LTPO OLED पॅनल्स देण्यात आले आहे, जो एडॅप्टिव रिफ्रेश, 1,440Hz हाई-फ्रीक्वेंसी PWM डिमिंग आणि 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट सपोर्ट देण्यात आला आहे.
Huawei Mate XTs मध्ये Kirin 9020 प्रोसेसर आणि 16GB रॅम देण्यात आला आहे. यामध्ये 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे आणि हे डिव्हाईस HarmonyOS 5.1 वर चालते. हा फोन M-Pen 3 स्टायलसला सपोर्ट करतो, ज्याला रिमोट कंट्रोल किंवा प्रेजेंटेशनसाठी लेजर पॉइंटरप्रमाणे वापरले जाऊ शकते.
फोटोग्राफीसाठी Huawei Mate XTs मध्ये 50-मेगापिक्सेल आउटर प्राइमरी कॅमेरा, 40-मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 12-मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आहे, जो 5.5x ऑप्टिकल जूम सपोर्ट करतो. कंपनीने सांगितलं आहे की, तिन्ही कॅमेऱ्यामध्ये RYYB पिक्सेल लेआउट आहे. प्राथमिक आणि पेरिस्कोप कॅमेरे OIS सपोर्टसह येतात. फ्रंटला 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेल्फी कॅमेरा आहे.
हा स्मार्टफोन 5,600mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे, जो 66W वायर्ड, 50W वायरलेस आणि 7.5W रिवर्स वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी, त्यात वाय-फाय 6, एनएफसी, ब्लूटूथ 5.2, यूडब्ल्यूबी, आयआर ब्लास्टर, सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. सिक्योरिटीसाठी यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.