मुंबई, कुर्ला येथील नेहरूनगरचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांना मोबाईलवर मुलगी असल्याचे भासवून अश्लील चॅटिंग करणाऱ्या आरोपीला जयपूर येथून अटक करण्यात आली आहे. हा आरोपी सिकरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असून, त्याचे नाव मौसमदीनपुत्र दीन मोहम्मद आहे. त्याला सिकरी पोलिसांनी अटक केल्यानंतर ताबा घेत मुंबई सायबर पोलिसांनी मुंबईत आणले.
बोगस तरूणीचा अश्लील व्हिडीयो
या प्रकरणी कुडाळकर यांनी मुंबई पोलीसांकडे तक्रार केल्यानंतर भरतपूरचे एसपी देवेंद्र कुमार विश्नोई यांनी तेथील पोलिसांना आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते. आरोपी मौसमदीन याने कुडाळकरांना व्हिडियो कॉल करून काही रक्कमही मागितल्याचा त्याच्यावर आरोप आहे, तर त्याचवेळी अश्लील व्हिडियो दाखवून व्हिडियो रिकॉर्डर ॲपच्या माध्यमातून त्याने तरुणीचा व्हिडियो बनविला होता.
[read_also content=”परमबीरसिंह प्रकरणात आरोपींना मिळतोय फायदा; सरकारी वकिलांचा आरोप https://www.navarashtra.com/india/accused-getting-benefits-in-parambir-singh-case-allegations-by-government-prosecutors-nrng-205428.html”]
मुंबई साइबर क्राईम पोलिसांची कारवाई
दरम्यान, त्याने व्हिडियो बनविल्यानंतर कुडाळकर यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे कुडाळकरांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तो जयपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मुंबई पोलीस जयपूरला रवाना झाले. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या मदतीने मुंबई साइबर क्राईम पोलिसांनी आरोपीचे लोकेशन ट्रेस करून तो राजस्थान येथील भरतपूर जिल्ह्यात असल्याचे शोधले. त्यानंतर पोलिसांची टीम भरतपूरमध्ये दाखल झाली. त्यांनी तेथील एसपी देवेंद्र विश्नोई यांच्याकडे मदत मागून पुढील कारवाई केली.