रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात NIA ला मोठे यश, हल्लेखोर मुसावीर हुसेन शाजिबला अटक!

बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने हल्लेखोर मुसावीर हुसेन शाजिबला अटक केली आहे. आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे.

  बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी (Bangalore Blast Case) मोठं अपडेट समोर आलं आहे. या प्रकरणी एनआयएला मोठे यश मिळालं असून हल्लेखोर मुसावीर हुसेन शाजिब (Mussavir Hussain Shazib) याला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी अनेक महिन्यांपासून फरार होता. एनआयएने आसाम आणि पश्चिम बंगालच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीची चौकशी सुरू आहे.

  बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने या घटनेत सहभागी असलेल्या एका प्रमुख संशयिताला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती, मुसाविर हुसेन शाजिब हा कॅफेमध्ये बॉम्ब ठेवण्यासाठी जबाबदार असल्याचे आढळून आले. या प्रकरणी दिवसाच्या तपासानंतर एनआयएच्या पथकाने संयुक्त कारवाईत हल्लेखोराला पकडले आहे.

  कधी झाला बॉम्बस्फोट

  बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये १ मार्च रोजी दुपारी १ वाजता हा बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटाने संपूर्ण परिसर हादरला होता. या स्फोटात एकूण 9 जण जखमी झाले आहेत. रामेश्वरम कॅफे स्फोटाचा संबंध ISIS या दहशतवादी संघटनेशी असल्याचे तपासात समोर आले आहे. एनआयएचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

  टोपीवरून आरोपी शाजिबची ओळख पटली

  कॅफे बॉम्बस्फोटातील संशयित मुसाविर हुसेन शाजिब याने घटनेच्या वेळी टोपी घातली होती. विशेष म्हणजे त्याची ओळख त्याच्या टोपीवरूनच होते. तपासादरम्यान, पोलिसांनी शाजीब एका दुकानातून टोपी खरेदी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. सीसीटीव्ही फुटेजमुळे शाजिब आणि त्याचा सहकारी अब्दुल मतीन ताहा यांची ओळख पटवण्यात मदत झाली. शाजिब हा कर्नाटकचा रहिवासी आहे. एनआयएला त्याचा मालेनाडू भागातील दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय आहे. या खुलाशामुळे मंगळूर आणि कोईम्बतूरमधील घटनांसह बॉम्बस्फोटांसारख्या प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींच्या नेटवर्कचीही माहिती समोर आली आहे.

  शाजीबचे तुरुंगात असलेले शारिक, मतीन आणि मुसाबीर यांच्याशी होते संबंध

  एनआयएने अटक केलेल्या शाजिबचे या प्रकरणात आधीच अटक करण्यात आलेल्या शरिक, मतीन आणि मुसाबीर या दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात पोलिस आरोपींनी यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची माहिती गोळा करत आहेत.