कोकणातील प्रत्येक घरी बनवला जाणारा चविष्ट नाश्ता! तांदळाच्या पीठाचा वापर करून बनवा मऊसूत घावणे
कोकणात बनवले जाणारे चविष्ट पदार्थ सगळ्यांच खायला खूप जास्त आवडतात. हे पदार्थ केवळ भारतामध्येच नाहीतर जगभरातील सर्वच देशांमध्ये फेमस आहेत. साधेपणा आणि तिथे तयार केलेल्या मसल्यांमुळे आणखीनीच सुंदर लागतात. त्यातील लोकप्रिय पदार्थ म्हणजे तांदळाच्या पीठाचे घावणे. कमी वेळ, कमी साहित्यात झटपट तयार होणारा पदार्थ सकाळच्या नाशत्यात किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता. मऊ, जाळीदार आणि चविष्ट घावणे चहा किंवा चटणीसोबत अतिशय सुंदर लागतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला नाशत्यात अतिशय हलके आणि सहज पचन होणारे पदार्थ हवे असतात. अशावेळी तुम्ही तांदळाच्या पिठापासून बनवलेले घावणे खाऊ शकता. घावणे बनवताना काही सोप्या टिप्स फॉलो करणे फार आवश्यक आहे. घावनाचे पीठ तयार करताना पाण्याचे प्रमाण योग्य असावे, अन्यथा घावणे व्यवस्थित होणार नाहीत. घावन करण्यापूर्वी पीठ १५ ते २० मिनिटं असेच झाकण मारून ठेवून घ्यावे. यामुळे चव आणि पिठाची गुणवत्ता सुधारते. चला तर जाणून घेऊया तांदळाच्या पीठाचे घावणे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






