“… तोपर्यत पद्मश्री परत घेणार नाही” ;  WFI ची मान्यता संपुष्टात आल्यावर, बजरंग पुनियाची पहिली प्रतिक्रिया

WFI ची मान्यता रद्द झाल्यानंतर दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पद्मश्री परत घेण्यास नकार दिला आहे.

    भारतीय कुस्ती महासंघ (WFI) ची मान्यता रद्द केल्यानंतर, रविवारी (24 डिसेंबर) ज्येष्ठ कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी सांगितले की, न्याय मिळेपर्यंत मी पद्मश्री पुरस्कार परत घेणार नाही.

    पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, बजरंग पुनिया म्हणाले की, मी पद्मश्री परत घेणार नाही. मला न्याय मिळाल्यावरच मी याचा विचार करेन.” तो म्हणाला, ”आमच्या बहिणींच्या सन्मानापेक्षा कोणतेही बक्षीस मोठे नाही… त्यांना आधी न्याय मिळाला पाहिजे.

    बजरंग पुनिया यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या निकटवर्तीय संजय सिंग यांच्या निवडीच्या निषेधार्थ त्यांचा पद्मश्री परत केला होता. ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग शुक्रवारी (२२ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे निषेध पत्र सादर करण्यासाठी कर्तव्य पथ मार्गावर आला होता. मात्र, पोलिसांनी त्याला तेथेच रोखले. यानंतर बजरंगने आपले पद्मश्री पदक पदपथावर ठेवले.

    यापूर्वी टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाने त्याच्या X हँडलवरून एक निवेदन जारी केले होते की, “मी माझा पद्मश्री सन्मान पंतप्रधानांना परत करत आहे. हा माझा स्वतःचा निर्णय आहे.” या पत्रात त्यांनी ब्रिजभूषण यांच्या विरोधातील आंदोलनापासून ते त्यांच्या जवळच्या मित्राच्या निवडणुकीतील विजयापर्यंत आणि सरकारी मंत्र्याशी झालेल्या संभाषण आणि त्यांच्या आश्वासनापर्यंत सर्व काही सांगितले होते आणि शेवटी पदश्री.परत करणार असल्याबाबत सांगण्यात आले होते.