file photo-social media
file photo-social media

लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) छत्तीसगडमधील विजापूरमध्ये सुरक्षादलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली असून या चकमकीत जवानांनी केलेल्या गोळीबारात 6 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे.

    रायपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) छत्तीसगडमधील विजापूरमध्ये सुरक्षादलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली असून या चकमकीत जवानांनी केलेल्या गोळीबारात 6 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे.

    याबाबत एसपी जितेंद्र कुमार यादव यांनी माहिती दिली आहे. ही चकमक चिपुरभट्टी भागातील तालपेरू नदी किनाऱ्यावर झाली. ही चकमक बिजापूर येथील बासागुडा पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झाली आहे. कोब्रा 210, 205, सीआरपीएफची 229 वी बटालियन आणि डीआरजी यांचा समावेश असलेल्या सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. जवानांनी जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांना घेरुन जोरदार गोळीबार केला.

    जवानांनी केलेल्या गोळीबारात 6 नक्षलवादी ठार झाले. या चकमकीनंतर जवानांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पती-पत्नी ठार : या चकमकीत उपकमांडर नागेश आणि त्याची पत्नी सोनी सह एसीएम गंगी, सदस्य आयतु चकमकीत ठार झाला. सर्व मृतदेह पोलिसांच्या छावणीत आणण्यात आले असून, सहापैकी चार नक्षल्यांची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली.