लुधियाना – देशाच्या पंजाबमधून (Punjab) एक मोठी बातमी समोर येत आहे. पंजाबच्या लुधियानामध्ये रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. (Gas Leak Ludhiana) लुधियानामध्ये गॅस गळती झाली आहे. या गॅस गळतीमुळं अजूनपर्यंत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 मुलांसह 5 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. मुले 10 आणि 13 वर्षांची आहेत. शहरातील ग्यासपुरा औद्योगिक क्षेत्राजवळील एका इमारतीत सकाळी 7.15 वाजता हा अपघात झाला. लुधियानाच्या एसडीएम स्वाती यांनी सांगितले की, गॅस गळतीमुळे 11 लोक बेशुद्ध पडले आहे. दरम्यान, एनडीआरएफची (NDRF) टीम मास्क घालून इमारतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मदतीचे आश्वासन…
दरम्यान, या घटनेनंतर पोलीस, प्रशासन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी हजर आहे. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, लुधियानाच्या ग्यासपुरा भागात गॅस गळतीची घटना अत्यंत वेदनादायक आहे. शक्य ती सर्व मदत केली जात आहे. याबाबतची संपूर्ण माहिती लवकरच देण्यात येईल. तसेच सर्व मदत करण्यात येईल, असं मुख्यमंत्री मान म्हणालेत.
इमारतीतून गॅस गळती
या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लुधियानाच्या ग्यासपुरा येथील सुआ रोडवरील गोयल कोल्ड ड्रिंक्स इमारतीतून गॅस गळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. या इमारतीच्या वरच्या भागात लोक राहत होते. लोक बेशुद्ध झाल्याचीही शक्यता आहे