Bihar Election 2025: NDAचं जागावाटप निश्चित; कुणाला मिळाल्या किती जागा? महाआघाडीचं घोडं कुठे अडलं?
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए’चं जागावाटप निश्चित झाल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्री आणि बिहारचे भाजप प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी जागावाटपासंदर्भात घोषणा केली आहे. एनडीएच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार, भाजप आणि जेडीयू दोन्ही प्रत्येकी १०१ जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील एलजेपी (आर) २९ जागांवर निवडणूक लढवेल. जितन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाला ०६ जागा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) लाही ०६ जागा देण्यात आल्या आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपेंद्र कुशवाह यांना देण्यात आलेल्या सहा जागांमध्ये उजीयारपूर, मधुबनी, सासाराम, दिनारा, महुआ आणि बाजपट्टी यांचा समावेश आहे. पण यासंदर्भात आज (१३ ऑक्टोबर) अधिकृत घोषणा केली जाईल. जीतनराम मांझी यांना देण्यात आलेल्या सहा जागांमध्ये टेकरी, कुटुम्बा, अत्री, इमामगंज, सिकंदरा आणि बाराचट्टी या सहा विधानसभा जागांचा समावेश आहे. तर, चिराग पासवान यांना त्यांच्या पसंतीच्या तीन जागा मिळवण्यात यश आल्याचेही सांगितले जात आहे. या तीन जागा सर्वात जास्त स्पर्धात्मक होत्या. हिसुआ, गोविंदगंज आणि ब्रह्मपूर या सर्व जागा चिराग पासवान यांना मिळाल्या आहेत.
Thackeray Brothers alliance :ठाकरे बंधूंच्या युतीला कॉंग्रेसचं ग्रहण? राज ठाकरेंचं नेमकं म्हणणं काय?
पीटीआयच्या वृत्तानुसार, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू होताच, धर्मेंद्र प्रधान यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. यात केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोक मोर्चा प्रत्येकी सहा जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्यानंतर, धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, ‘एनडीएच्या सर्व मित्रपक्षांनी जागावाटप प्रक्रिया सौहार्दपूर्णपणे पूर्ण केली आहे. सर्व एनडीए पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून या निर्णयाचे स्वागत होत आह. बिहार दुसऱ्या एनडीए सरकारसाठी तयार आहे.
१५ जागांची मागणी करणारे जीतन राम मांझी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या घोषणेपूर्वी, आपण शेवटच्या श्वासापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उभे राहणार.” असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच, जागावाटपाच्या घोषणेनंतर मांझी यांनी भाजप नेतृत्वाचा निर्णय स्वीकारणार असल्याचेही त्यांनी असे सांगितले असले तरी, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कथित कमी लेखण्याबद्दल देखील व्यक्त केले, ज्याचा एनडीएवर परिणाम होऊ शकतो. मांझी यांना सहा जागा मिळाल्या.
जागावाटपाची घोषणा काही दिवसांच्या तीव्र वाटाघाटीनंतर झाली. एनडीएचे सहयोगी चिराग पासवान, जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांनी भाजपशी जोरदार वाटाघाटी केल्या, अनेकदा वादही झाला आणि ते वाद शांतही झाले. सुरुवातीला ४० जागांसाठी आग्रही असलेले चिराग पासवान यांना २९ जागांसाठी राजी करण्यात भाजपला यश आले. महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या चिराग पासवान यांच्याकडे एकही आमदार नाही.
IIT JAM 2026: आयआयटी जॅम एक्झामसाठी नोंदणी तारीखमध्ये वाढ, आता 20 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी
दुसरीकडे बिहारमधील विरोधी इंडिया आघाडी पुढील काही दिवसांत जागावाटपाचा अंतिम निर्णय घेणार आहे. तर या आठवड्यात आपले उमेदवार जाहीर करू शकते, अशी अपेक्षा आहे. माहितीनुसार, राजद आणि काँग्रेसमध्ये अद्यापही चर्चा सुरू आहेत. राजद प्रमुख लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव नवी दिल्लीत असल्याने सोमवारी दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे.
जागावाटपाच्या घोषणेसाठी झालेल्या विलंबाबद्दल, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, त्यांना “महाआघाडी” मध्ये काही नवीन मित्रपक्षांचा समावेश होणार आहे. त्यांनाही जागावाटपाच्या व्यवस्थेत समावून घ्यावे लागणार आहे. त्या सर्व जागांवर अंतिम निर्णय घेण्याची आणि पुढील दोन ते तीन दिवसांत त्यांची घोषणा करण्याची आशा आहे. यावेळी काँग्रेस किती जागा लढवेल याबद्दल विचारले असता, जयराम रमेश म्हणाले, “अर्धशतक ते शतकाच्या दरम्यान.” खरं तर, गेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवल्या आणि १९ जागा जिंकल्या, तर राजदने १४४ जागा लढवल्या आणि ७५ जागा जिंकल्या.
२०२० मध्ये, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूने ११५ जागा लढवल्या, तर भाजपने ११० जागा लढवल्या. मांझी यांच्या एचएएमने ७ जागा लढवल्या आणि मुकेश साहनी यांच्या व्हीआयपींनी ११ जागा लढवल्या. त्यावेळी साहनी एनडीएचा भाग होते. तथापि, नितीश कुमार यांच्याशी मतभेद असल्याने चिराग पासवान यांच्या पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत एनडीएने १२५ जागा जिंकल्या, तर महाआघाडीने ११० जागा जिंकल्या.