त्रिपुरा(Tripura) मेघालय (Meghalaya)आणि नागालँड (Nagaland) या तीन ईशान्येकडील राज्यांमध्ये आज निकाल येत आहेत. मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या फेरीत भाजपने त्रिपुरामध्ये सहज बहुमत मिळवले आहे. त्याचवेळी नागालँडमध्ये भाजपसोबत एनडीपीपी आघाडीवर आहे. मेघालयमध्ये, विद्यमान मुख्यमंत्री कोनराड संगमा यांची एनपीपी आघाडीवर आहे. तिन्ही राज्यांमध्ये 60-60 जागा आहेत. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला आणि नागालँड आणि मेघालयमध्ये २७ फेब्रुवारीला निवडणुका झाल्या. सध्या त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार आहे, तर नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) नागालँडमध्ये भाजप आणि मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) यांच्याशी युती करत आहे.
[read_also content=”‘या’ ठिकाणी सापडली चक्क सोन्यानं भरलेली कबर! 3200 वर्ष जुना खजिना पाहून पुरातत्वशास्त्रज्ञही आश्चर्यचकित https://www.navarashtra.com/world/gold-filled-tomb-found-in-armenia-archaeologist-surprised-to-see-3200-year-old-treasure-373459.html”]
त्रिपुरातील सर्व 60 जागासांठीची मतमोजणी सुरु आहे. भाजप 36 जागांवर आघाडीवर आहे, डावे 15 आणि टीएमपी 9 जागांवर आघाडीवर आहेत. नागालँडमध्ये भाजप युतीसह एनडीपीपी 37, एनपीएफ 8 आणि काँग्रेस 2 आणि इतर 13 जागांवर आघाडीवर आहे. तर मेघालयमध्ये एनपीपी 27 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 5 जागांवर आणि भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे.
नागालँडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. येथे भाजप 60 पैकी 50 जागांवर आघाडीवर आहे. एनपीएफला येथे 6 जागा मिळत आहेत तर काँग्रेस एका जागेवर पुढे आहे. अपक्ष उमेदवारांनी तीनवर आघाडी घेतली आहे.नागालँडमध्ये NDPP (भाजप युती) पुन्हा सत्तेत आल्याचे ट्रेंड दाखवतात. आतापर्यंत 58 जागांवर आलेल्या ट्रेंडनुसार NDPP 36 जागांवर पुढे आहे. तर NPF 7 जागांवर तर कॉंग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे.
मेघालयात स्थिती काहीशी वेगळी दिसत आहे. येथे NPP आणि TMC यांच्यात लढत आहे. येथे NPP 20 जागांवर आघाडीवर आहे तर TMC 16 जागांवर आघाडीवर आहे.