चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप विजयी (फोटो- टीम नवराष्ट्र)
चंदीगड: दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शेवटच्या टप्यात आला आहे. याच दरम्यान चंदीगडमध्ये महापौरपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. भाजपच्या उमेदवार असलेल्या हरप्रीत बाबला या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचा विजय झाल्याने आम आदमी पक्ष आणि कॉँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
भाजपने चंदीगड महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. हरप्रीत बाबला या भाजपच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. हरप्रीत बाबला या दुसऱ्यांदा नगरसेवक बनल्या आहेत. तर आता त्या चंदीगडच्या नवीन महापौर असणार आहेत. तर आम आदमी पक्ष आणि कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रेमलता या पराभूत झाल्या आहेत. हरप्रीत बाबला यांना 19 मते मिळाली. तर प्रेमलता यांना 17 मते मिळाली. हरप्रीत बाबला या निवृत्त कर्नल यांची मुलगी आणि माजी महापौर देविन्दर सिंह यांच्या पत्नी आहेत.
महापौरपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा आहे. भाजपकडे आधी 16 च मते होती. मात्र क्रॉस व्होटिंग झाल्याने तीन मते भाजपकडे ट्रान्सफर झाली आणि भाजपचा उमेदवार विजयी झाला. या निवडणुकीत कॉँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे एकत्रितपणे निवडणूक लढत होते. त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. मात्र या ठिकाणी एकत्रित लढत असलेले हे दोन पक्ष दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मात्र आमने-सामने लढत आहेत.
चंदीगड महानगरपालिकेत भाजप 16 नगरसेवकांसाह सर्वात मोठा पक्ष आहे. तर आम आदमी पक्ष आणि कॉँग्रेसकडे अनुक्रमे 13 आणि 6 नगरसेवक आहेत. यामुळे कॉँग्रेस आणि आपकडे एकूण 19 मतांचे पाठबळ होते. मात्र क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे भाजपने महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. भाजपच्या हरप्रीत बाबला या चंदीगडच्या नवीन महापौर बनल्या आहेत.
काय म्हणाले देविंदरसिंह बाबला ?
भाजप जिंकणार याचा आम्हाला पहिल्यापासूनच विश्वास होता असे हरप्रीत बाबला यांचे पती देविंदर सिंह बाबला म्हणाले. महापौर कुलदीप कुमारने केवळ जनतेला लुबाडण्याचे काम केले. ते केवळ स्वतःसाठी कमवत होते. नगरसेवक देखील त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. यामुळे लोकांनी आम्हाला मते दिली.