उत्तर प्रदेश: बहिणीचं प्रेमप्रकरण (Love Affair) एका भावाच्या एवढ्या डोळ्यात खुपत होतं की त्याने तिच्या प्रियकराला पार्टीच्या बहाण्याने बोलवून त्याचा कायमचा काटा काढला. ही घटना आहे झांसीतील. (Jhansi) इथल्या तालपुरा येथील अरुण परिहार या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. आठ जणांनी अरुणला एका खोलीत बंद करून मरेपर्यंत मारहाण केली. एव्ढ्यावरच न थांबत त्यांनी नंतर मृतदेह घरात ठेवून त्याच्यासोबत दिवसभर नॅानव्हेज आणि दारूची पार्टीही केली.
[read_also content=”‘जे हात वाजतात टाळ्यांसाठी, तेच हात धावले मदतीसाठी’, चालत्या ट्रेनमधली ही घटना ऐकलीत का ? https://www.navarashtra.com/india/transgenders-made-woman-delivered-in-howrah-patana-train-bihar-video-viral-nrps-362328.html”]
तालपुरा येथील रहिवासी अरुण परिहार (२७) मुलगा महाराज सिंह परिहार हा व्यवसायाने मेकॅनिक होता. शनिवारी त्यांचा मृतदेह उनाव येथील पाहुंज नदीत तरंगताना आढळून आला. पोलीस तपासात त्याचे कोतवाली परिसरात राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम असल्याचे समोर आले आहे. अरुणची मुलीच्या भावांशी मैत्री होती. ८ डिसेंबरला मुलीच साक्षगंध झालं. अरुणने दारूच्या नशेत जात तेथे चांगलाच गोंधळ घातला.
[read_also content=”‘जे हात वाजतात टाळ्यांसाठी, तेच हात धावले मदतीसाठी’, चालत्या ट्रेनमधली ही घटना ऐकलीत का ? https://www.navarashtra.com/india/transgenders-made-woman-delivered-in-howrah-patana-train-bihar-video-viral-nrps-362328.html”]
या गोष्टीचा मुलीचा भाऊ नितीन आणि अंकित यांना राग आला. या लोकांनी अरुणला धडा शिकवण्याचे ठरवले. अरुणला 12 डिसेंबरला दारू पार्टीच्या नावाने घरी बोलावण्यात आले. नितीन आणि अंकितसह नंदराम, त्याची पत्नी मीना, विकास, विशाल, हृतिक, चंदू आणि राहुल आधीच इथे उपस्थित होते. अखेर गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. अरुणचा भाऊ छोटू याच्या तक्रारीवरून सर्व नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे,
शुक्रवारी सकाळपर्यंत आठ आरोपींनी अरुणला बेदम मारहाण केली. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. मारेकऱ्यांनी अरुणच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली पण तोपर्यंत सकाळ झाली होती. त्यानंतर मृतदेह खोलीत बंद करून तेथे चिकन आणि दारूची पार्टी केली. संधी पाहून शनिवारी सकाळी मृतदेह कारमध्ये भरून उनाव येथील नदीत फेकून त्याने तेथून पळ काढला. यानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. दुसरीकडे नदीतून मृतदेह सापडल्यानंतर अरुणची ओळख पटली. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले.