नवी दिल्ली : सध्या हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येणे ही गंभीर बाब बनत चालली आहे. त्यात कर्करोग अर्थात कॅन्सरही (Cancer) वाढताना दिसत आहे. असे असताना यापासून वाचण्यासाठी शाकाहार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण यातून या आजारांचा धोका कमी होईल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे मांसाहार सोडून आता अनेक लोक शाकाहाराकडे वळले आहेत.
कोरोनानंतर हार्ट अटॅक आणि सतत वाढणाऱ्या कॅन्सरच्या भीतीमुळे शाकाहारींची संख्या वाढली आहे. ‘द ग्रेट ग्रीन वॉल’च्या अभ्यासानुसार, शाकाहारी लोकांना हृदयविकाराचा झटका 32 तर कर्करोग होण्याची शक्यता 17 टक्क्यांनी कमी होते. ब्रिटनच्या मार्केटिंग रिसर्च आणि डेटा ऍनालिसिस फर्म यूगोवने केलेल्या अभ्यासानुसार, 2022 मध्ये 65 टक्के भारतीयांनी शाकाहारीचा पर्याय निवडला आहे.
शाकाहारी अन्नामध्ये अधिक फायबर, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, जीवनसत्त्वे ए, सी आणि ई चांगल्या प्रमाणात असतात. यामुळे तब्बल 120 आजार लांब राहतात. कोरोनानंतर शाकाहारी पिझ्झा, बर्गर, पास्ता आणि इतर फास्ट फूडची विक्री 70 टक्क्यांवर पोहोचली आहे. जी पूर्वी 50 टक्क्यांपेक्षा कमी होती.
शाकाहाराचे अनेक फायदेही आहेत. यामध्ये मुलांच्या मेंदूचा 18 टक्के अधिक विकास होतो. 8 टक्के कमी गर्भपात होतात. कर्करोगाचा धोका 12 टक्क्यांनी कमी होतो. इतकेच नाहीतर हार्ट अटॅकचा धोका 40 टक्क्यांनी कमी होतो, असे संशोधनातून समोर आले आहे.