फोटो सौजन्य - Social Media
काल देशभरातील कानाकोपऱ्यात अगदी सगळीकडे बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाची खरी मज्जा विशेषता शाळांमध्ये असते. मुंबईतील अनेक शाळांमध्ये हा दिवस फार उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या या विशेष दिवसाला विशेष करण्यात शिक्षकांनीही कसून कष्ट केल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील शाळांमध्ये आणि ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन झाले. पण त्यात वांद्रे पश्चिम येथे स्थित असलेल्या ‘सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल’ आणि मुलुंड येथे स्थित असलेल्या ‘सौ. लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूल’ची चर्चा काही औरच आणि वेगळी ठरली. (St. Teresa Boys High School)
या चर्चेला कारणीभूत येथे आयोजित कार्यक्रमाची आखणी ठरली. अतिशय वेगळ्या पद्धतीने येथे कार्यक्रमाचे आयोजन झाले. सेंट टेरेसा बॉईज हायस्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे नाटिका सादर करण्यात आली पण हे नाट्य विद्यार्थ्यांकडून सादर केले जाते. पण या वर्षी काही हटके करण्यात आले. यावर्षी चक्क शिक्षकांनीच नाटक सादर करून सर्व विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. शिक्षकांच्या या नाट्याला विद्यार्थ्यांनी उर्स्फुर्त प्रतिसाद दिला. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या आयोजनामागचे उद्देश स्पष्ट केले. त्यांच्या मते या कार्यक्रमामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये असणारे नाते अधिक दृढ झाले. त्यांच्या नात्यात मैत्रीचा टच मिळाला आणि शिकवणीदरम्यान या गोष्टीचा नक्कीच फायदा दिसून येणार आहे. (Mrs. Laxmibai English Medium School)
तर मुलुंडच्या सौ. लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘डिजिटल डिटॉक्स’ हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना वाढत्या मोबाईल व सोशल मीडिया व्यसनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता करण्यात आली. हा संपूर्ण दिवस या शाळेने ‘Without Bag School’ म्हणून साजरा केला. या दिवशी कोणताही पुस्तकी अभ्यासक्रम शिकवण्यात आला नाही. हा दिवस मस्ती मज्जेचा ठरला. तर विशेष म्हणजे, इयत्ता 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांनी दररोज रात्री 9 ते 10 हा तास Digital Detox करण्याची शपथ घेतली. त्यांनी सांगितले की या तासात विद्यार्थी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपपासून दूर राहून छंद जोपासणार आणि कुटुंबासोबत वेळ घालवणार. (Children’s Day)






