नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधील (National Stock Exchange) सर्व्हर घोटाळ्याप्रकरणी (NSE Scam) सीबीआयनं देशात एकूण १८ ठिकाणी छापे (CBI Raid) टाकले आहेत. या घोटाळा प्रकरणामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Notice To Sanjay Pandey) यांनादेखील नोटीस आल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात ईडीनंही चौकशीला सुरुवात केली आहे. एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरुद्धही एनएसई अधिकाऱ्यांचे फोन टॅप (Phone Tapping) करणे आणि इतर अनियमितता केल्यामुळे नवीन गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संजय पांडे यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे.
[read_also content=”मुंबईत २४ तासांसाठी रेड अलर्ट, मनपाने ट्विट करत दिला सावधानतेचा इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/red-alert-for-mumbai-due-to-heavy-rain-nrsr-301879.html”]
आयसेक सर्व्हिसेस प्रा. लि. ही सॅाफ्टवेअरशी संबंधित कंपनी २००१ मध्ये पांडे यांनी ते सेवेत नसताना स्थापन केली. सेवेत रुजू झाल्यावर पांडे यांनी या कंपनीच्या संचालकपदाचा २००६ मध्ये राजीनामा दिला. या कंपनीत पांडे यांचे कुटुंबीय संचालक आहेत. संतोष पांडे हे २००३ पासून या कंपनीचे पूर्णवेळ संचालक आहेत. या कंपनीवर एनएसईने २०१० ते २०१५ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सॉफ्टवेअरसंबंधित लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपविली होती. सर्व्हरमध्ये फेरफार होऊनही त्याबाबतची कल्पना लेखापरीक्षण कंपनीला कशी मिळाली नाही ? की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले ? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यासंदर्भातच संजय पांडेंची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणी संजय पांडे आणि चित्रा रामकृष्ण यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.