भारताची अंतराळ संस्था इस्रोने (ISRO) मानवाला अंतराळात पाठवण्यात मोठे यश मिळवले आहे. इस्रोने चांद्रयान-3 (Chandrayaan-3) अंतराळयानाचे प्रणोदन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरित्या परत आणले आहे. चंद्रावर एखादी वस्तू पाठवून ती परत आणण्याची इस्रोची क्षमता यातून सिद्ध झाली आहे.
[read_also content=”चेन्नईत मुसळधार पावसामुळे पाच जणांचा मृत्यू, कार पाण्यात वाहुन गेल्या; विमानतळावर भरलं पाणी! https://www.navarashtra.com/india/five-people-died-due-to-heavy-rains-in-chennai-due-to-effect-of-michong-cyclone-nrps-486324.html”]
विक्रमने (लँडर) चंद्रावर उडी मारल्यानंतर ही आणखी एक कामगिरी असल्याचे इस्रोने म्हटले आहे. इस्रोने सांगितले की, “दुसऱ्या एका अनोख्या प्रयोगात, चांद्रयान-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून काढले गेले आहे आणि विक्रम लँडरवरील HOP प्रयोगाप्रमाणे ते पृथ्वीच्या कक्षेत आणले गेले आहे. ते पृथ्वीभोवती फिरत आहे.”
वास्तविक, भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला होता. यानंतर चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेतला. चंद्राच्या पृष्ठभागावरून विक्रम लँडर उचलून इस्रोने चंद्रावर अवकाशयान पाठवून ते परत आणण्याची क्षमता दाखवून दिली होती.
चांद्रयान-3 चे प्रक्षेपण 14 जुलै 2023 रोजी रॉकेट LVM3-M4 सह करण्यात आले. 23 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला. चंद्राच्या या भागात पोहोचणारा भारत हा एकमेव देश आहे. चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश आहे. याआधी रशिया, अमेरिका आणि चीन चंद्रावर पोहोचले होते.