file photo
file photo

मणिपूर हिंसाचार प्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात सीबीआयने महिलांची परेड आयोजित केल्याचा आरोप केला आहे. तिच्यावर बलात्कार झाला. पोलिसांनी त्याला गर्दीत ढकलले होते.

    गेल्या वर्षभरापासून हिंसाचाराच्या (Manipur Violence)आगीत होरपळत असलेलं मणिपूर अद्यापही सावरलेलं नाही आहे. गेल्या वर्षी 4 मे रोजी एका समाजातील दोन महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता. या घटनेच्या तब्बल दोन महिन्यांनंतर आता एफआयआर दाखल झाली होती. तर, आता वर्षभरानंतर मणिपूर हिंसाचारप्रकरणी सीबीआयने सध्या आरोपपत्र दाखल केले आहे. या संदर्भात सीबीआयने एक अहवा सादर करण्यात आला आहे ज्यामध्ये महिलांवरील अत्याचार प्रकरणाचा खुलासा  झाला आहे. महिलांची काढण्यात आलेली धिंडही आयोजित केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. एवढेच नाही तर महिलांना मदत करण्याऐवजी पोलिसांनी महिलांना गर्दीत ढकलल्याचा दावा करण्यात आला असून पोलीसही (Manipur Police) या हिंसाचारासाठी दोषी आढळले आहेत.

    4 मे 2023 रोजी घडली होती घटना

    सीबीआयच्या आरोपात असे म्हटले आहे की, सुरुवातीला मणिपूरमधे मेतेई आणि कुकी समुदायांमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाला. हा हिसांचार दिवसेंदिवस वाढतच होता. दरम्यान, 4 मे 2023 रोजी घडलेल्या घटनेत मणिपूर पोलिसांनी सुमारे एक हजार लोकांच्या गर्दीतून दोन महिलांना पळवून नेले होते. पोलिसांनीच महिलांना जमावाच्या स्वाधीन केले होते. जिथे त्यांना प्रथम विवस्त्र करून परिसरात त्यांची धिंड करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. जुलैमध्ये जेव्हा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा या घटेबद्दल कळलं.

    महिलांनी पोलिसांची मदत मागितली होती

    सीबीआयच्या आरोपपत्रात असे म्हटले आहे की,  महिलांनी पोलिसांची मदत मागितली होती, परंतु त्यांनी स्वत: जमावाच्या स्वाधीन करून ते टाळले होते. यातील एक महिला कारगिल युद्धातील एका शहीद जवानाची पत्नी होती. पोलिसांनी मदत करण्याऐवजी त्याला जमावाकडे नेले आणि सोडून दिले. या प्रकरणात, 16 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथील विशेष सीबीआय न्यायाधीशांसमोर सहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र आणि कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल एका मुलाविरुद्ध अहवाल दाखल करण्यात आला होता.