चेतक आणि चीता निवृत्त होणार; सैन्यात 200 नव्या हेलिकॉप्टर्सची तैनात होणार
भारतीय लष्कराने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय लष्कराचे जुने इंजिन चीता आणि चेतक हेलीकॉप्टर्स बदलण्यासाठी महत्ताची पावले उचलली आहेत. पण आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि चांगल्या नियंत्रणाअभावी या हेलिकॉप्टर्सचे अनेक अपघातही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने शुक्रवारी १२० पाळत ठेवणे आणि शोध हेलिकॉप्टरची माहिती मागवली आहे.
त्याच वेळी, आगामी काळात भारतीय हवाई दलासाठी ८० हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी योजना आखली जात आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्रायाने, चीता-चेतकच्या जागी शक्य तितक्या लवकर आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि डिझाईनचे हेलीकॉप्टर्स हवाई दलात सामील केली जातील असे म्हटले आहे. नवीन हेलिकॉप्टर दिवसा आणि रात्री देखरेख करू शकतील, विशेष मोहिमांसाठी काही सैनिकांना घेऊन जातील आणि जमिनीवर सैन्याच्या समर्थनार्थ देखील काम करतील. हे हेलिकॉप्टर अटॅक हेलिकॉप्टरसह स्काउटिंगचे काम देखील करतील.
गेल्या दोन दशकांपासून सैन्याकडून सुमारे ३५० जुन्या चीता-चेतक हेलिकॉप्टर बदलण्यासाठी नवीन हलक्या हेलिकॉप्टरर्सची मागणी केली जात आहे. सैन्याकडे सध्या एचएएल ३ टन वजनाचे १८७ हलके युटिलिटी हेलिकॉप्टर बनवत आहे, त्यापैकी १२६ लष्करासाठी आणि ६१ हवाई दलासाठी आहेत. या नवीन हेलिकॉप्टरच्या आगमनानंतर, २०२७ पासून जुन्या हेलिकॉप्टटर्सची सेवा बंद केली जाईल, यासाठी जवळपास १० वर्षे लागतील.
‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत भारतीय नौदलासाठी ६० युटिलिटी हेलिकॉप्टर तयार करण्याची योजना अद्याप प्रारंभिक टप्प्यातच आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक तपशील निश्चित करणे, खरेदी प्रक्रिया आखणे आणि संभाव्य विक्रेत्यांची निवड करणे हे काम सध्या सुरू आहे. यामध्ये भारतीय कंपन्यांना परदेशी उत्पादकांसोबत भागीदारी करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत विलंब होत असल्याने नौदलाच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच चीता आणि चेतक हेलिकॉप्टरमध्ये काचेचे कॉकपिट आणि चांगली नियंत्रण प्रणाली यांसारखी आधुनिक उड्डाण उपकरणे नाहीत. त्यामुळे खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमध्ये उड्डाणादरम्यान वैमानिकांना अनेक अडचणींचाही सामना करावा लागतो मदत करतात. यामुळे या हेलिकॉप्टरची विश्वासार्हता आणि सुरक्षितता प्रभावित होते.
RSS Mohan Bhagwat: …तर विनाश निश्चित; निवृत्तीकडे इशारा करत मोहन भागवतांचा मोदींना सल्ला
२०१५ मध्ये ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत २०० कामोव-२२६टी हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी भारत आणि रशिया यांच्यात २ अब्ज डॉलर्सचा करार झाला होता. या प्रकल्पाअंतर्गत लष्करासाठी १३५ आणि हवाई दलासाठी ६५ हेलिकॉप्टर तयार होणार होते. मात्र, किंमतवाढ आणि इतर तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प पूर्णत्वाला जाऊ शकला नाही. परिणामी, सशस्त्र दलांच्या हलक्या युटिलिटी हेलिकॉप्टरच्या गरजा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.
लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) हे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित, बहुउद्देशीय लढाऊ हेलिकॉप्टर असून ते उंचावर, डोंगराळ भागात आणि कठीण हवामानात कार्य करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे आधुनिक एव्हियोनिक्स, रात्रीची दृष्टी क्षमता आणि प्रगत लक्ष्यीकरण प्रणालींनी सज्ज आहे, ज्यामुळे दिवस-रात्र आणि सर्व हवामान परिस्थितीत मोहिमा पार पाडता येतात.
LCH शत्रूच्या टाक्या, बंकर, ड्रोन आणि कमी उडणाऱ्या विमानांना लक्ष्य करू शकते. त्याच्या हलक्या आणि चपळ डिझाइनमुळे ते अरुंद आणि अवघड भूप्रदेशातसुद्धा सहज उड्डाण करू शकते. हे हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी शस्त्रे, रॉकेट व क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकते, ज्यामुळे जमिनीवरील दलांना जवळून हवाई आधार देण्यात ते अत्यंत प्रभावी ठरते.