गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिक महागाईच्या झळा सोसत आहेत. अशातच आता या महागाईतून सर्वसामान्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळणार आहे. आजपासून (1 जुलै) गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले. तेल विपणन कंपन्यांकडून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल केला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत आजपासून 30 रुपयांनी स्वस्त करण्यात आले.
आता दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर १६७६ रुपयांऐवजी १६४६ रुपयांना मिळणार आहे. हा सिलिंडर आता कोलकातामध्ये १७५६ रुपयांना उपलब्ध आहे, पूर्वी त्याची किंमत १७८७ रुपये होती. मुंबईत सिलिंडरची किंमत 1629 रुपयांवरून 30 रुपयांनी कमी होऊन 1598 रुपयांवर आली आहे. चेन्नईमध्ये 1809.50 रुपयांना सिलेंडर उपलब्ध आहे. तसेच 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. हे दिल्लीमध्ये 803 रुपये आणि मुंबईमध्ये 802.50 रुपये मध्ये उपलब्ध आहे.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 9 मार्च 2024 रोजी शेवटचा बदल करण्यात आला आणि दर 100 रुपयांनी कमी करण्यात आला. आता घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे. 1 जून 2023 रोजी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1103 रुपये होती. कंपन्यांनी 30 ऑगस्ट 2023 रोजी त्यात 200 रुपयांची मोठी कपात जाहीर केली आणि नंतर किंमत 903 रुपयांपर्यंत खाली आला. यानंतर पुन्हा 9 मार्च 2024 रोजी कंपन्यांनी त्याची किंमत 100 रुपयांनी कमी केली होती.