'पोडियम, माईक तोडणाऱ्या मुख्यमंत्री'; अल्का लांबा यांचा दिल्लीच्या CM रेखा गुप्तांवर हल्लाबोल, Video ही केला व्हायरल
भाजपच्या रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री बनल्या असून आज त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या काही तास आधी, काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी रेखा गुप्ता भाजप नगरसेवक असतानाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल केला आहे. अलका लांबा आणि रेखा गुप्ता कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. त्यावेळी दिल्लीच्या युवा राजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या दोघीही प्रमुख युवा नेत्या होत्या. अखेर प्रदीर्घ काळानंतर रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर वर्णी लागली आहे.
दिल्ली की नवनियुक्त मुख्यमंत्री रेखा गुप्ता @gupta_rekha का एक वीडियो सोशल मीडिया पर तेज़ी से वायरल हो रहा है – जिस पर लिखा है “मिलिए दिल्ली की मुख्यमंत्री से”.
BJP की पार्षद रहते हुए सदन में उनके व्यवहार और आचरण पर सवाल उठाए जा रहे हैं – इस वीडियो में वह सरकारी सम्पति को नुकसान… pic.twitter.com/wXYplHGa02
— Alka Lamba 🇮🇳 (@LambaAlka) February 20, 2025
लांबा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली, ज्यात “दिल्लीच्या नवनियुक्त मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यावर “दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना भेटा” असं लिहिले आहे. भाजप नगरसेवक असताना सभागृहात असताना त्यांच्या वर्तनावर आणि वागण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या व्हिडिओमध्ये, त्या सरकारी मालमत्तेचे नुकसान करताना आणि हिंसक झालेल्या पहायला मिळत आहेत. सर्वोच्च पदावर बसलेल्या नेत्याचे वर्तन आदर्श असले पाहिजे – अशा असंसदीय/हिंसक पद्धतीने वागताना, त्यांना कदाचित विचारही केला नसेल की एक दिवस त्या दिल्लीची मुख्यमंत्री होतील. जर विधानसभेतील विरोधी पक्ष यापुढेही अशाच पद्धतीने वागत असेल तर त्यावर रेखा गुप्ता काय म्हणतात आणि काय करतात हे पाहायचे आहे. दिल्ली आणि दिल्लीकरांना माझ्या शुभेच्छा.”, असं त्यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Delhi: Congress leader Alka Lamba says, “My greetings to the new Delhi CM Rekha Gupta… I went into nostalgia when her name was announced… We always had an ideological battle with her… The safety of our daughters is the main concern in Delhi; I hope she works on… pic.twitter.com/NY433rwjBv
— ANI (@ANI) February 20, 2025
दरम्यान अलका लांबा यांनी रेखा गुप्ता यांचं अभिनंदन करत एक जुना फोटो शेअर केला आहे. १९९५ मध्ये लांबा यांनी DUSU निवडणूक जिंकली आणि NSUI च्या त्या अध्यक्षा बनल्या होत्या. त्याच वर्षी रेखा गुप्ता ABVP कडून सरचिटणीस म्हणून निवडून आल्या होत्या. अलका लांबा यांनी आधी शेअर केलेले ते फोटो आहेत, ज्यावेळी दोन्ही तरुण नेत्या DUSU च्या पदाधिकारी म्हणून शपथ घेत असतानाचा तो क्षण आहे.