लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (फोटो- सोशल मीडिया)
ओम बिर्ला यांच्या चेंबरमध्ये कॉँग्रेस खासदारांचा गोंधळ
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केले मोठे आरोप
ओम बिर्ला यांना शिवीगाळ केल्याचे केले आरोप
Congress VS Om Birla Politics: सध्या राजधानी दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात गेले काही दिवस गोंधळ पाहायला मिळाला. जनरल नरवणे यांच्या पुस्तकावरून खडाजंगी झाली. विरोधी पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडण्याची तयारी सुरू केली यह. त्यातच आता संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी कॉँग्रेस खासदारांवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.
‘कमीत कमी 20 ते 25 कॉँग्रेस खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या चेंबरमध्ये घुसले आणि त्यांना शिवीगाळ केली. मी सुद्धा त्यावेळेस तिथे होतो. लोकसभा अध्यक्ष चांगल्या मनाचे आहेत, नाहीतर त्यांच्यावर कडक कारवाई झाली असती. प्रियांका गांधी आणि केसी वेणुगोपाळ वरिष्ठ कॉँग्रेस नेते खासदारांना भडकावत होते, ” असे किरेन रिजीजू म्हणाले.
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू पुढे म्हणाले, “कॉँग्रेस खासदारांनी अध्यक्षांशी गैरवर्तनच नव्हे तर संसदीय नियमांचे उल्लंघन केले. लोकसभा अध्यक्षांच्या दालनात प्रवेश करून त्यांना शिवीगाळ केले गेली. अध्यक्षांनी परवानगी दिल्याशिवाय सदस्य सभागृहात बोलू शकत नाही. देशाचे पंतप्रधान देखील अध्यक्षांची परवानगी घेऊनच बोलतात.
ओम बिर्ला यांनी घेतला मोठा निर्णय
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विरोधकांनी मोठा गोंधळ घातला आहे. अनेक मुद्द्यांवरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लिहिलेले “स्टार्स ऑफ डेस्टिनी: Four Stars of Destiny’ या पुस्तकावरुन वाद निर्माण झाला. यानंतर जोरदार वाद निर्माण झाला. यामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या आणि विरोधकांना सातत्याने बोलताना टोकल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावासाठी निवेदन मांडले आहे.
हे देखील वाचा : “पुरावे नाहीत अन् आरोप मोठे…”, राहुल गांधींच्या दाव्यांवरून सरकार आक्रमक; रिजिजूंनी स्पष्ट केली भूमिका
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर निर्णय होईपर्यंत सभागृहात उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना हटवण्याच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत ते लोकसभेच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत. संसदीय नियमांनुसार असे कोणतेही बंधन नसले तरी, ओम बिर्ला यांनी सभागृहापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार किंवा विरोधी पक्ष त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु त्यांनी आपला निर्णय स्पष्ट केला आहे की ते सभागृहात उपस्थित राहणार नाहीत.






