Photo credit : X@Narendra Nath Mishra
बंगळूरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्रकार परिषद सुरू असतानाच एका काँग्रेस नेत्याला हार्ट अटॅक आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बंगळुरू येथील कोलार कुरूबा मतदारसंघाचे अध्यक्ष सी.के. रवीचंद्रन असे या नेत्याचे नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी म्हैसूर नगरविकास प्राधिकरण ( मुडा ) जमीन वितरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात खटला चालविण्याची परवानगी दिली. यासंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, सी.के. रवीचंद्रन माध्यामांश संवाद साधत होते. काही मिनिट त्यांनी माध्यमांशी संवाद साधतान ते काही क्षण थांबले, त्यांच्या हातातूव कागद खाली पडला आणि त्याचवेळी तेदेखील जमीनीवर कोसळले.
हेदेखील वाचा: वेळ आली पण काळ आला नव्हता; ओढ्यात वाहून गेलेले दोघेजण प्रसंगावधानामुळे बचावले
यानंतर रवींद्र यांना तातडीनं खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. हार्ट अटॅकनं त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
कर्नाटक में कांग्रेस नेता CK Ravichandran को प्रेस कांफ्रेंस के दौरान आया हार्ट अटैक। हुई मौत।
ऐसे LIVE हार्ट अटैक मेडिकल इमरजेंसी के रूप में सामने आई है।
pic.twitter.com/XUZJkc5oWX— Narendra Nath Mishra (@iamnarendranath) August 19, 2024
2021 मध्ये, मुडाने विकासासाठी म्हैसूरच्या केसरे गावात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांच्याकडून 3 एकर जमीन संपादित केली. त्या बदल्यात त्यांना दक्षिण म्हैसूरमधील उच्चभ्रु परिसराती विजयनगरमध्ये जमीन देण्यात आली. विजयनगरमधील जमिनीचा भाव त्यांच्या केसरे येथील जमिनीपेक्षा खूप जास्त आहे. मुडाकडून या जमिनींच्या वाटपात अनियमितता झाल्याचा आरोप आहे.
हेदेखील वाचा: आवळ्याचे सरबत प्यायल्याने शरीराला होतात जबरदस्त फायदे
आरटीआय कार्यकर्ते अब्राहम यांनी त्यांच्या तक्रारीत आरोप केला आहे की 2023 च्या विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात सिद्धरामय्या त्यांच्या पत्नीची मालकी उघड करण्यात अयशस्वी ठरले. वास्तविक, MUDA ही कर्नाटकची राज्यस्तरीय विकास संस्था आहे. या एजन्सीचे काम शहरी विकासाला चालना देणे हे आहे. यासोबतच लोकांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून द्यावी लागतील.