चवीला तुरट असलेला आवळा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतो. आवळ्यामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते, जे त्वचा आणि केसांच्या निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच यामध्ये अँटी-ऑक्सिडंट, कर्करोग-विरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. शक्तिशाली फळांच्या यादीमध्ये आवळ्याचे नाव अनेकदा घेतले जाते. काहींना नुसता आवळा खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही आवळ्यापासून बनवलेले सरबत पिऊ शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आवळ्याचे सरबत प्यायल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
आवळा सरबत पिण्याचे फायदे
आवळ्याचे सरबत प्यायल्याने वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी आवळ्याच्या सरबताचे सेवन करावे.
हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आवळ्याच्या सरबताचे सेवन करावे. यात अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे कोलेस्टेरॉलचा धोका कमी होतो.
सकाळी उठल्यानंतर रोज एक ग्लास आवळ्याच्या सरबताचे सेवन केल्यामुळे अशक्तपणा कमी होऊन शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. पोटामधील जळजळ कमी करण्यासाठी आवळ्याच्या सरबताचे सेवन करावे.
आवळ्यामध्ये विटामिन ए आढळून येते, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. अँटी-डायबेटिक गुणधर्म असलेल्या आवळ्याचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
निरोगी केस आणि त्वचेच्या आरोग्यसाठी आवळ्याचा रस गुणकारी आहे. यामुळे काळी पडलेली त्वचा उजळते. तसेच केस गळती थांबते.