केंद्र सरकारने देशातील काही वैद्याकीय महाविद्यालयाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने (central Government) देशातील 40 वैद्यकीय महाविद्यालयांची (Medical Colleges) मान्यता रद्द केली आहे. तसेच, केंद्र सरकार देशातील आणखी 150 वैद्यकीय महाविद्यालयांवरही लक्ष ठेवून आहेत. म्हणजे, त्यांच्यावरही लवकरच कारवाई होऊ शक्यता नाकारता येत नाही. याचं कारण म्हणजे, चौकशीदरम्यान या महाविद्यालयांमध्ये तसेच, तेथील व्यवस्थेत अनेक प्रकारच्या त्रुटी आढळ्याचं केंद्र सरकारच्या निदर्शनास आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहेत.
[read_also content=”पदकाचे विसर्जन न करता कुस्तीपटू परतले, ‘हा राजकीय आखाडा नाही’, गंगासभा अध्यक्षांनी कुस्तीपटूंना सुनावत विसर्जन करण्यापासून रोखलं https://www.navarashtra.com/india/wrestlers-return-without-medals-immersion-in-ganga-river-in-haridwar-nrps-407122.html”]
नॅशनल मेडिकल कमिशनच्या यूजी महाविद्यालयातील व्यवस्था आणि सुविधांची बोर्डानं ही तपासणी केली होती, त्यानंतर या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी काही महाविद्यालयं विहित नियमांचं पालन करत नाहीत आणि आयोगानं केलेल्या तपासणीत सीसीटीव्ही कॅमेरे, आधार-लिंक्ड बायोमेट्रिक हजेरी प्रक्रिया आणि फॅकल्टी रोलशी संबंधित अनेक त्रुटी आढळल्या आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे.
[read_also content=”क्ररकर्मा साहिलला कठोर शिक्षा देणार, अरविंद केजरीवालांच आश्वासन; साक्षीच्या कु़टुंबियांना 10 लाख नुकसान भरपाई जाहीर https://www.navarashtra.com/crime/arvind-kejriwal-promises-to-punish-karkarma-sahil-severely-10-lakh-compensation-announced-to-sakshis-families-nrps-406618.html”]
केंद्र सरकारनं ज्या 40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द केली. त्यामध्ये गुजरात, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच, आणखी दीडशे वैद्यकीय महाविद्यालयांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीदरम्यान जर या महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळून आल्या तर त्यांचीही मान्यताही रद्द करण्यात येईल, असं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मान्यात रद्द करण्यात आलेल्या या 40 महाविद्यालयांमध्ये अनेक प्रकारच्या कमतरता आढळून आल्या आहेत. ज्यामध्ये कॅमेरा, बायोमेट्रिक हजेरी, प्राध्यापकांची कमतरता यांसारख्या प्रमुख समस्या होत्या. यासोबतच इतर अनेक बाबींवरही ही महाविद्यालयं तपासणीत खरी ठरली नाहीत. मात्र, या महाविद्यालयांना मान्यता रद्द करण्याच्या विरोधात दाद मागण्याचा पर्याय अजूनही आहे. ज्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे ते सर्व 30 दिवसांच्या आत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे अपील करू शकतात.






