Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Bagdogra Flight Bomb : दिल्ली-बागडोगरा विमानात बॉम्ब..! वॉशरुममध्ये सापडली चिठ्ठी अन् करावे लागले Emergency Landing

दिल्लीहून बागडोगरा येथे जाणाऱ्या एका विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर लखनौ विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले आणि विमानाची तपासणी केली.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 18, 2026 | 01:08 PM
Delhi-Bagdogra flight bomb threat led to an emergency landing in Lucknow marathi news

Delhi-Bagdogra flight bomb threat led to an emergency landing in Lucknow marathi news

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली-बागडोगरा विमानात बॉम्ब असल्याची धमकी
  • Flight 6E-6650 चे आपत्कालीन लँडिंग
  • वॉशरुममध्ये चिठ्ठी सापडल्याने उडाला गोंधळ
Delhi Bagdogra Flight Bomb Threat : नवी दिल्ली : राजधानी दिल्लीहून (Delhi News) बागडोगरा येथे जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची चिठ्ठी आढळली. यामुळे रविवारी विमानामध्ये खळबळ उडाली. सुरक्षेच्या कारणास्तव, विमान ताबडतोब लखनौला वळवण्यात आले. या धमकीमुळे विमानाचे आपत्कालीन लॅडिंग (Emergency Landing) करण्यात आले. यानंतर बॉम्ब निकामी करणारे पथक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताबा घेतला आणि कसून तपासणी केली.

रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी दिल्लीहून बागडोगरा (पश्चिम बंगाल) येथे जाणाऱ्या विमानाचे आपत्कालीन लॅडिंग करावे लागले. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर विमानामध्ये बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडली. हे विमान इंडिगोचे होते. विमानाच्या वॉशरुममध्ये टिशू पेपरवर या विमानामध्ये बॉम्ब असल्याचे लिहिण्यात आले होते. हा टिशू पेपर एका प्रवाशाला सापडल्यानंतर त्याने तातडीने हे क्रू मेंबरला दाखवले. या विमानामध्ये एकूण 230 प्रवासी, दोन पायलट आणि पाच क्रू मेंबर प्रवास करत होते.

हे देखील वाचा : आधीच प्रदुषण अन् आता दाट धुके: दिल्ली NCR मध्ये वाहन चालवताना अडथळा, IMD ने दिला इशारा

उड्डाणादरम्यान, बॉम्बच्या धमकीची गोपनीय माहिती मिळाली, त्यानंतर वैमानिकांनी विमान उतरवण्याची परवानगी मागितली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा नियमांचे पालन करून लखनौच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जवळचे विमानतळ म्हणून संपर्क साधला. लखनौमध्ये उतरण्याची परवानगी मिळाल्यानंतर, विमानाने तेथे आपत्कालीन लँडिंग केले. लँडिंगनंतर, विमान धावपट्टीच्या एका सुरक्षित भागात नेण्यात आले, जिथे वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा एजन्सी आधीच सतर्क झाल्या होत्या.

हे देखील वाचा : ममता दिदी सावधान! पश्चिम बंगालला PM Modi 830 कोटींची भेट देणार; तर ‘या’ सभेतून प्रचाराचे रणशिंग फुंकणार

रविवारी सकाळी ८:४६ वाजता एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) ला इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईट ६ई-६६५० वर बॉम्बचा इशारा मिळाला. हा इशारा मिळताच लखनौ विमानतळावर आपत्कालीन लँडिंगची तयारी करण्यात आली. आपत्कालीन लँडिंगनंतर विमान एका आयसोलेशन व्हेईकलवर पार्क करण्यात आले. लखनौ विमानतळावर विमान थांबवण्यात आले आणि त्याची कसून तपासणी करण्यात येत आहे. विमानाच्या प्रत्येक कोपऱ्याची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नसल्याने प्रवासी, क्रू मेंबर्स आणि अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

पोलिसांनी काय म्हटले? 

अग्निशमन दलाचे अधिकारी रजनीश वर्मा यांनी सांगितले की, अग्निशमन दल आणि बीडीएस पथक विमानाची तपासणी करत आहेत. अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. टिश्यू पेपरवर बॉम्बचा इशारा कोणी लिहिला आहे हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस या घटनेच्या विविध पैलूंचा तपास करत आहेत.

Web Title: Delhi bagdogra flight bomb threat led to an emergency landing in lucknow marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • air india
  • Bomb threat
  • Delhi news

संबंधित बातम्या

Drug Test : एअर इंडियाच्या पायलटची तडकाफडकी हकालपट्टी; ‘या’ चुकीने उध्वस्त केले संपूर्ण करिअर!
1

Drug Test : एअर इंडियाच्या पायलटची तडकाफडकी हकालपट्टी; ‘या’ चुकीने उध्वस्त केले संपूर्ण करिअर!

Video : दिल्ली विमानतळावरच साचले पावसाचे पाणी; चालणेही झाले अवघड, प्रवाशांची मोठी गैरसोय
2

Video : दिल्ली विमानतळावरच साचले पावसाचे पाणी; चालणेही झाले अवघड, प्रवाशांची मोठी गैरसोय

Big Breaking: टिशूवर लिहिलेल्या ‘त्या’ शब्दाने खळबळ; Air India च्या फ्लाइटचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग
3

Big Breaking: टिशूवर लिहिलेल्या ‘त्या’ शब्दाने खळबळ; Air India च्या फ्लाइटचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.