पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो- सोशल मिडिया)
पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
मोदी करणार ‘परिवर्तन संकल्प’ सभेला संबोधित
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला आले महत्व
West Bengal: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमध्ये 830 कोटींच्या कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी आज सिंगूर जिल्ह्याल भेट देणार आहेत. त्या ठिकाणी ते रेल्वेशी संबंधित आणि पायाभूत सुविधानशी संबंधित कामांची सुरुवात करणार आहेत. तसेच ते परिवर्तन संकल्प सभेच्या माध्यमातून जनतेला संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधील सिंगूर जिल्ह्यात 830 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण अन् उद्घाटन करणार आहेत. 3 वाजता मोदी एका प्रशासकीय कार्यक्रमात सहभाग होणार आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून बंगालमधील पायाभूत सुविधा मजबूत करणे हे उद्देश असणार आहे. यातून राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी फायदा होणार आहे.
आज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आज सुरू होणाऱ्या तीन रेल्वे गाड्यांची नावे आणि यादी खालीलप्रमाणे.
हावडा-आनंद विहार टर्मिनल अमृत भारत एक्सप्रेस.
सियालदह-वाराणसी अमृत भारत एक्सप्रेस.
संत्रागाची-तांबरम अमृत भारत एक्सप्रेस
Spectacular Bagurumba Dwhou programme in Guwahati! pic.twitter.com/MhTGiqP8eS — Narendra Modi (@narendramodi) January 17, 2026
दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी परिवर्तन संकल्प सभेला संबोधित करणार आहेत. यामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या सभेसाठी उत्सुक आहेत. तसेच तृणमूल कॉँग्रेस आक्रमक भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन याकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
Narendra Modi यांनी केले महायुतीचे अभिनंदन
महाराष्ट्राचे आभार ! राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत! विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा , राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे.
“महाराष्ट्राचे आभार, अहोरात्र परिश्रम करणाऱ्या…”; PM Narendra Modi यांनी केले महायुतीचे अभिनंदन






