फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली : दिल्लीतील मेट्रो सेवेला आज फटका बसण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीतील ब्लू लाईन मेट्रोमध्ये केबल चोरीचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना कीर्तीनगर-मोतीनगर दरम्यान घडली. त्यामुळे मेट्रोच्या सेवेवर परिणाम होताना दिसत आहे. या घटनेमुळे ब्लू लाईनवरून मेट्रो धीम्या गतीने धावणार आहे. डीएमआरसीने याबाबत एक निवेदन जारी केले आहे.
Blue Line Update
Delhi Metro shall make an attempt to repair the impacted section between Moti Nagar and Kirti Nagar from 12:45 PM onwards.
During this period, single line operation will be done between Subhash Nagar and Kirti Nagar.
However, in case the repair work takes…
— Delhi Metro Rail Corporation (@OfficialDMRC) December 5, 2024
DMRC ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली आहे. मोती नगर आणि कीर्ती नगर दरम्यान केबल चोरीमुळे ब्लू लाईनवरील सेवांना उशीर होत असल्याचे डीएमआरसीने म्हटले आहे. प्रवाशांना होणाऱ्या या गैरसोयीबद्दल दिलगिरीही व्यक्त करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : ‘फेंगल’मुळे वातावरणात कमालीचा बदल; पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता कायम
डीएमआरसीने ट्विटरवर लिहिले की, ‘मोती नगर आणि कीर्ती नगर दरम्यानच्या ब्लू लाईनवरील केबल चोरीची समस्या रात्रीच्या कामकाजाची वेळ संपल्यानंतरच सोडवली जाईल. दिवसभरात बाधित भागावर गाड्या मर्यादित वेगाने धावणार असल्याने, सेवांना थोडा विलंब होईल. प्रवासाला काही अतिरिक्त वेळ लागणार असल्याने प्रवाशांनी त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ब्लू लाईन ही सर्वात व्यस्त रेल्वेसेवा म्हणून ओळखली जाते. याला दिल्ली मेट्रोचा सर्वात व्यस्त मार्ग देखील म्हटले जाते. मेट्रोचा वेग कमी असल्याने लोकांना बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे.
DMRC केले वेळेसंबंधी नियोजन करण्याचे आवाहन
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी)ने सिग्नल वायरच्या चोरीमुळे, दिवसभरात दोन स्थानकांदरम्यान मेट्रोचे कामकाज संथ गतीने सुरू ठेवण्यात येईल, जेणेकरून प्रवाशांना प्रवास करताना जास्त गैरसोयीचा सामना करावा लागू नये, अशी खबरदारी घेण्यात येत आहे.
ब्लू लाईनवर असते प्रवाशांची गर्दी
मेट्रो द्वारका सेक्टर 21 ते नोएडा इलेक्ट्रॉनिक सिटी आणि वैशालीपर्यंत ब्लू लाईनवर चालते. यामुळे हा कॉरिडॉर एनसीआरमधील दोन प्रमुख शहरांना दिल्लीशी जोडतो. त्यामुळे या कॉरिडॉरच्या मेट्रोमध्ये प्रवाशांची जास्त गर्दी असते.