धक्कादायक! दिल्लीत पोलीस अधिकाऱ्यानं स्व:ताला गोळी मारुन केली आत्महत्या, तीन दिवसापुर्वीच झालं पत्नीचं निधन

दिल्ली पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 55 वर्षीय दिल्ली पोलिस अधिकारी अनिल सिसोदिया यांचा दक्षिण-पूर्व दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

    नवी दिल्ली: दिल्लीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्लीत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्व:ताच्या राहत्या घरात गोळी मारुन आत्महत्या (Delhi Police Officer commit Suicide) केली आहे. तणाव आणि नैराश्यातून त्यांनी आत्महत्येसारखं पाऊस उचलल्याचं सांगण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे अवघ्या तीन दिवसापुर्वींच त्यांच्या पत्नीच निधन झालं होतं.

    नेमकं प्रकरण काय?

    दिल्ली पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 55 वर्षीय दिल्ली पोलिस अधिकारी अनिल सिसोदिया यांचा दक्षिण-पूर्व दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना दक्षिण पूर्व दिल्लीतील जंगपुरा भागात घडली, जिथे तो राहतो. मृत अनिल सिसोदिया हे दिल्लीच्या दक्षिण-पश्चिम भागात सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) म्हणून तैनात होते. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांच्या ५५ ​वर्षीय एसीपीचे नाव अनिल सिसोदिया असे आहे. त्याने आपल्या जंगपुरा येथील राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

    तीन दिवसांपूर्वी पत्नीचं झालं निधन

    मृत पोलीस अधिकारी अनिल सिसोदिया यांच्या पत्नीचे तीन दिवसांपूर्वीच निधन झाले होते. असे मानले जाते की त्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर, तो उद्ध्वस्त झाला होता आणि तणाव आणि नैराश्याने ग्रस्त होता. नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले असावे. पोलीस याला आत्महत्या म्हणत असले तरी अनिल सिसोदिया यांनी एवढं मोठं पाऊल कोणत्या परिस्थितीत उचललं असेल याचाही तपास केला जात आहे. सध्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांना ओळखणाऱ्यांनाही धक्का बसला आहे.