देशातील अनेक राज्यात मुसळधार पावसाने कहर केला असून सध्या हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये, गुजरात महाराष्ट्रात चांगलाच पाऊस सुरू आहे. पावसामुळे यमुना नदीच्या पाणी पातळीत (Delhi Rains )वाढ झाली असून नदीन धोक्याची पातळी ओलांडली आहे. सोमवारी सकाळी नदीची पाणी पातळी 206.24 वर पोहोचली.
[read_also content=”ट्विटरमध्ये आता पुन्हा होणार मोठा बदल! नव्या रंगारुपासह Twitter येणार यूजर्सच्या भेटीला https://www.navarashtra.com/world/elon-musk-announced-twitter-logo-will-change-its-logo-nrps-435902.html”]
यमुनेच्या पाण्याची पातळी 206.4 मीटरपर्यंत वाढल्यामुळे, जुन्या यमुना पुलाचे (जुना लोहा पुल) काम रविवारी 2215 वाजल्यापासून स्थगित करण्यात आले, असे उत्तर रेल्वेने सांगितले. दिल्ली आणि शाहदरा दरम्यानचा मार्ग बंद केला जाईल, असेही त्यात म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नदीच्या पाण्याची पातळी 205.33 मीटरवर होती. 13 जुलै रोजी 208.66 मीटरच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली होती. केंद्रीय जल आयोगाच्या (CWC) आकडेवारीनुसार शनिवारी रात्री 10 वाजता पाण्याची पातळी 205.02 मीटरवरून रविवारी सकाळी 9 वाजता 205.96 मीटर झाली जी रात्री 9 वाजता वाढून 206.42 मीटर झाली. याशिवाय, यमुनेची उपनदी नोएडातील हिंडन नदीच्या पाण्याच्या पातळीतही शनिवारी वाढ झाली. सखल भागात असलेली अनेक घरे पाण्यात बुडाली.
13 जुलैनंतर, यमुना नदीच्या पाणी पातळी 208.66 मीटरच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचल्यानंतर हळूहळू कमी होत होती, परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाण्याच्या पातळीत किरकोळ चढ-उतार झाले आहेत. आठ दिवसानंतर १८ जुलै रोजी रात्री ८ वाजता पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाच्या वर गेली. 10 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता नदीने धोक्याचे चिन्ह ओलांडले, ज्यामुळे राष्ट्रीय राजधानीला मोठ्या प्रमाणात पूर आला.
नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे दिल्लीतील अनेक ठिकाणी पाणी साचले आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.
भारतीय हवामान खात्याने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात २५ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, दिल्ली जल मंडळाचे उपाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी रविवारी वजिराबाद जलशुद्धीकरण केंद्राची (WTP) पाहणी केली आणि ते म्हणाले की, दिल्ली सरकारने पुराचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये प्रवेश करू नये म्हणून संवेदनशील ठिकाणी तटबंदी आणि मजबुतीकरण केले आहे.