संग्रहित फोटो
भारतीय निवडणूक आयोग (Election Commission) आज सकाळी 11:30 वाजता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka assembly Election) तारखा जाहीर करणार आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होऊ शकते. कर्नाटकातील विद्यमान भाजप सरकारचा कार्यकाळ २४ मे रोजी संपत आहे.
[read_also content=”सांगलीत द्राक्ष व्यापाऱ्यासोबत लूटमार, गाडीतील 1 कोटी रोख रक्कम असलेली बॅग पळवली https://www.navarashtra.com/maharashtra/robbery-with-grape-trader-in-sangli-bag-containing-1-crore-cash-in-car-stolen-nrps-379262.html”]
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, निवडणूक आयोग आज सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन तारखांची घोषणा करणार आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत येडियुरप्पा 17 मे 2018 रोजी मुख्यमंत्री झाले. 23 मे 2018 रोजी अवघ्या सहा दिवसांनी त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाले.