India General Election 2024 Full Schedule Announcement Live :
लोकसभा निवडणुकीचे बिगूल काही क्षणांतच वाजणार आहे. तत्पूर्वी निवडूक आयुक्त राजीव कुमार हे तारीख जाहीर करणार आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आम्ही यावेळी देशातील निवडणुकीत 97 कोटी मतदार मतदान करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आम्ही निवडणुकीत कोणतीही हिंसा, पैशांचा दुरुपयोग आम्ही बिलकुल सहन करणार नाही. तसेच, नवीन मतदारांचेदेखील त्यांनी स्वागत केले आहे. जे मतदार मतदान करण्यासाठी असमर्थ असतील तेथे आम्ही पोहचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Lok Sabha Elections: Polls to be held from April 19 in 7 phases, result on June 4 Read @ANI Story | https://t.co/lNhOfL2w5L#lokshabhaelecton2024 #RajivKumar #ChieElectionCommissioner pic.twitter.com/3XKWKTjnCq — ANI Digital (@ani_digital) March 16, 2024
एवढे मतदार मतदान करणार
यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत 21.5 कोटी नवीन मतदार असणार आहेत. त्यानंतर 49 कोटी पुरुष मतदार असणार आहेत. 82 लाख मतदार 85 वर्षाच्या वर असणार आहेत. 47 कोटी मतदार या महिला असणार आहेत. आम्ही प्रत्येक ठिकाणी जाणार ज्या ठिकाणी मतदार आहे. जे मतदान करू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहचणार आहोत. 19 करोड नवीन मतदार असतील जे पुढील वर्षात मतदानाचे अधिकार प्राप्त करतील.
देशभरात निवडणुकीचा उत्साह दिसून येतो आहे. प्रचारसभा आणि रॅली यांचा उत्साह दिसून येईल. आता किती टप्प्यात निवडणूक लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसरी टर्मही आमचीच असल्याचा दावा केला आहे. तर राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने तिसऱ्यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत असं म्हटलं आहे. निवडणूक आयोग आता किती टप्प्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करतात आणि निकालाची तारीख काय असेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.






