Tesla CEO Elon Musk apologizes to Piyush Goyal

  जगातील आघाडीची मोटार उत्पादक कंपनी टेस्ला नवीन वर्षात म्हणजे जानेवारी २०२४ मध्ये भारतातील बाजारपेठेत आगमन होण्याची शक्यता आहे. अशातच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी कॅलिफोर्निया येथील टेस्ला मोटार उत्पादन होत असलेल्या कारखान्याला भेट दिली. मात्र, टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी पियूष गोयल यांची माफी मागितली आहे.
  नेमकं काय झालं?
  पीयूष गोयल यांनी कॅलिफोर्निया येथील टेस्ला मोटार उत्पादन होत असलेल्या कारखान्याला भेट दिली. पण, प्रकृतीच्या कारणास्तव मस्क यांना पियूष गोयल यांना भेटता आले नाही. म्हणून मस्क यांनी ‘एक्स’ ( ट्विटर) अकाउंटवरून पियूष गोयल यांची माफी मागितली आहे.

  पीयूष गोयल ‘एक्स’ अकाउंटवर म्हणाले, “कॅलिफॉर्निया येथील टेस्लाच्या मोटार उत्पादन कारखान्यास भेट दिली. टेस्लात भारतीय अभियांत्रिक वरिष्ठ पदावर काम करतात. ते टेस्लाच्या परिवर्तनामध्ये देत असलेल्या योगदानाबद्दल पाहून आनंद झाला.”
  “टेस्लाने वाहनिर्मितीसाठी भारतातून सुटे भाग आयात केले आहेत. याचा अभिमान वाटतो. आगामी काळात सुटे भागाची आयात दुप्पट होण्याची शक्यता आहे. मस्क यांची प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा,” असे पियुष गोयल यांनी म्हटलं.
  यावर एलॉन मस्क म्हणाले, तुम्ही टेस्लाला दिलेली भेट ही अभिमानास्पद बाब आहे. कॅलिफोर्नियाला येथे आपली भेट घेऊ शकलो नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. लवकरच आपली भेट होईल, अशी आशा व्यक्त करतो.