Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3 : “भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध! परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे युद्धजन्य परिस्थितीवर राज्यसभेत भाष्य

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर एस जयशंकर यांनी राज्यसभेमध्ये भूमिका मांडली आहे. त्यांनी भारतीय नागरिकांना सुरक्षित देशामध्ये परत आणणे हे प्राधान्य असल्याचे सांगितले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 09, 2026 | 12:49 PM
External Affairs Minister S Jaishankar speaks in Rajya Sabha about India role in Iran-Israel war

External Affairs Minister S Jaishankar speaks in Rajya Sabha about India role in Iran-Israel war

Follow Us
Close
Follow Us:
  • मध्यपूर्व भागांमध्ये युद्धजन्य तणावपूर्ण परिस्थिती
  • परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची राज्यसभेमध्ये माहिती
  • भारताच्या भूमिकेवर मांडले स्पष्ट मत
Israel Iran War: नवी दिल्ली : मध्य पूर्व भागांमध्ये युद्धजन्य (Israel Iran War) परिस्थिती निर्माण झाली असून याची झळ आता भारतापर्यंत बसू लागली आहे. अनेक भारतीय नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटक हे आखाती देशांमध्ये अडकले आहेत. या सर्वांना सुरक्षितरित्या भारतामध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अनेकांना भारतामध्ये आणण्यात आले आहे. देशातील तेलसाठा आणि गॅससाठा याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी राज्यसभेमध्ये माहिती दिली आहे.

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. यामध्ये इराण-इस्रायल युद्धावरुन विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. अमेरिकेकडून ताप्तुरती रशियाकडून तेल खरेदीची परवानगी मिळाल्यामुळे देखील विरोधक आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर एस जयशंकर यांनी राज्यसभेमध्ये भूमिका मांडली आहे. त्यांनी भारतीय नागरिकांना सुरक्षित देशामध्ये परत आणणे हे प्राधान्य असून सरकार यासाठी कटिबद्ध अशी भूमिका घेतली आहे.

“The Prime Minister continues to closely monitor the emerging developments, and relevant ministries are coordinating to ensure effective responses,” says EAM Dr S Jaishankar as he makes a statement in the Rajya Sabha on the situation in West Asia. https://t.co/AXC9nujGpk pic.twitter.com/dDLt9S92QH — ANI (@ANI) March 9, 2026

हे देखील वाचा : संसदीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु; जागतिक युद्धावरुन मोदी सरकारला पकडणार कोंडीत?

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर राज्यसभेमध्ये म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि संबंधित मंत्रालये प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी समन्वय साधत आहेत. आमच्या सरकारने २० फेब्रुवारी रोजी एक निवेदन जारी करून खोल चिंता व्यक्त केली आणि सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक कूटनीतिचा अवलंब केला पाहिजे असे आमचे मत आहे.” अशी भूमिका परराष्ट्रमंत्रालयाने मांडली आहे.

हे देखील वाचा : मनसेला 20 वर्षे पूर्ण; वर्धापनदिनी राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले, “काय कमावलं..”

भारतासाठी चिंतेचा विषय

पश्चिम आशियातील परिस्थितीवर परराष्ट्रमंत्री राज्यसभेत निवेदन देत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ सुरू केला. यादरम्यान, जयशंकर यांनी सभागृहात सरकारची भूमिका मांडली आणि या प्रदेशातील वाढत्या तणावाबद्दल भारताची चिंता व्यक्त केली. एस. जयशंकर म्हणाले, “हा चालू संघर्ष भारतासाठी विशेष चिंतेचा विषय आहे. आपण शेजारी आहोत आणि पश्चिम आशियामध्ये स्थिरता राखणे ही आपली जबाबदारी आहे. दहा लाख भारतीय आखाती देशांमध्ये राहतात आणि काम करतात. काही हजार भारतीय शिक्षण किंवा रोजगारासाठी इराणमध्ये देखील आहेत. हा प्रदेश आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे आणि त्यात तेल आणि वायूचे अनेक महत्त्वाचे पुरवठादार समाविष्ट आहेत. पुरवठा साखळीतील गंभीर व्यत्यय आणि परिणामी अस्थिरता हे गंभीर मुद्दे आहेत.” अशी भूमिका परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेमध्ये मांडली आहे.

Web Title: External affairs minister s jaishankar speaks in rajya sabha about india role in iran israel war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • rajya sabha
  • S. Jayshankar

संबंधित बातम्या

दुसऱ्यांचं युद्ध, चीनचा लाभ! Iran America संघर्षात China चा ‘Business’ जोरात! Dollar ची मोठी कमाई
1

दुसऱ्यांचं युद्ध, चीनचा लाभ! Iran America संघर्षात China चा ‘Business’ जोरात! Dollar ची मोठी कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.