मुंबई : प्रसिद्ध हेअरड्रेसर जावेद हबीबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका शोदरम्यान महिलेच्या केसांवर थुंकताना दिसत आहे. हा व्हिडिओ मुजफ्फरनगरमधील एका शोचा आहे. ३ जानेवारीला एका शोमध्ये हबीबने केसांची देखभाल आणि शॅम्पूचे महत्त्व सांगताना महिलेच्या केसांमध्ये थुंकले.
जावेद हबीब और उसके नाम के किसी भी सैलून में जाने से पहले ये वीडियो ज़रूर देख लें… हबीब का ब्रांड ही थूक पर चलता है. शर्मनाक pic.twitter.com/MaCJCKJS0N
— Himanshu Mishra ?? (@himanshulive07) January 5, 2022
महिलेच्या केसात थुंकल्यानंतर जावेद हबीब या थुंकीत जीव असल्याचे सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही महिला बागपतमधील बरौतची रहिवासी आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हबीबवर जोरदार टीका होत आहे. या महिलेचे म्हणणे आहे की, जावेद हबीब याने तीन दिवसांपूर्वी महामार्गावरील हॉटेल किंग व्हिला येथे एका कार्यशाळेत प्रात्यक्षिक दाखवले होते.
केस कोरडे आहेत म्हणून जावेद हबीबने महिलेच्या केसांवर थुंकले होते. माझ्या केसात थुंकून हबीबने माझा जाहीर अपमान केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रार्श्वभूमीकर या कृत्यामुळे लोक जावेद हबीबवर टीका करत आहेत. दरम्यान एसएसपी अभिषेक यादव यांनी याबाबत सांगितले की, व्हिडिओशी संबंधित अधिक माहिती गोळा केली जात आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.