उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश मधून अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे.
बहराइच-लखनौ महामार्गावर ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात झाला. या घटनेत हा प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात 15 जण जखमी झाले आहेत.
[read_also content=”मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर तीन ट्रक एकमेकांना धडकले; एक ट्रक 100 फूट दरीत कोसळला https://www.navarashtra.com/maharashtra/three-trucks-collided-on-mumbai-pune-express-nrps-349632.html”]
बहराइच-लखनौ महामार्गावरील जारवाल रोड पोलीस स्टेशन हद्दीतील घाघरा घाटाजवळ बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. घाघराघाट स्टेशनजवळ जयपूरहून बहराइचकडे येणारी ईदगाह डेपोची बस एका ट्रकला धडकली. धडक एवढी जोरदार होती की बसच्या मागील भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच जारवाल पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
[read_also content=”दिनविशेष ३०, नोव्हेंबर २०२२; राजीव दिक्षीत – सामाजिक कार्यकर्ता यांचा जन्म दिवस https://www.navarashtra.com/lifestyle/special-day-30-november-2022-birthday-of-rajiv-dixit-social-activist-nrrd-349634.html”]
या अपघाताची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्तर करण्यात येत आहे. या भीषण अपघातात ट्रक चालकानेही जीव गमावला आहे. तर, अनेक लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना सर्व प्रशासनाने संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.