नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचे संकट अद्याप देखील टळलेले नाही. नवनवीन व्हेरिएंटत येत आहेत. अशातच धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरस KP.2 हा नवीन व्हेरिएंट गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 पासून भारतातील लोकांमध्ये आला आहे. या व्हायरसला FLIRT असे नाव देण्यात आले आहे.
कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट FLIRT हा अमेरिका, ब्रिटन आणि दक्षिण कोरियामधील कोरोनाच्या वाढत्या केसशी जोडला जात आहे. कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट FLIRT Omicron वंशाचा सब व्हेरिएंट आहे. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, KP.2 हा व्हेरिएंट JN.1 चा एक भाग मानला जातो. त्यात नवनवीन म्युटेशन्स आहेत. त्याचे नाव FLIRT या अक्षरांच्या आधारे देण्यात आले आहे.
सध्या या नवीन व्हायरसपेक्षा JN.1 चा भारतात जास्त प्रभाव आहे. या प्रकाराची 679 प्रकरणे भारतात सक्रिय आहेत. ही आकडेवारी 14 मे पर्यंतची आहे. सध्या सर्व डॉक्टर यावर लक्ष ठेवून आहेत. असे जरी असले तरी यामध्ये घाबरण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.