नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरचे (Jammu Kashmir) माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात (Pulwama Attack) गंभीर आरोप केले होते. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी त्यांच्या दाव्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यात आज सत्यपाल मलिक यांची पाच तासांपेक्षा जास्त वेळ सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.
सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदावर कार्यरत असताना दोन फायली निकाली काढण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यावरूनच त्यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या वेळी जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असलेले मलिक यांनी अलीकडील एका मीडिया मुलाखतीत आरोप केला की, ‘सीआरपीएफने सैनिकांना नेण्यासाठी विमान मागितले होते. परंतु, केंद्रीय गृह मंत्रालयाने ही विनंती नाकारली होती. हा हल्ला सीआरपीएफ आणि गृह मंत्रालयाच्या ‘अक्षमतेचा’ परिणाम असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच या मार्गाचे स्वच्छतेचे काम प्रभावीपणे झाले नसल्याचा दावाही त्यांनी केला. या टिप्पण्यांमुळे प्रचंड राजकीय वादळ उठले आणि विरोधी पक्षांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.