नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee ) यांची आज ९८वी जयंती आहे. अटलजी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. देशाचे पंतप्रधान म्हणून अटलजींचा प्रवास इतका संस्मरणीय होता की त्याचे उदाहरण आजही दिलं जाते. लोक आजही त्यांना मनापासून आठवतात.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. अटलबिहारी वाजपेयी यांनीही स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. 1942 मध्ये महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनात ते खूप सक्रिय होते आणि तुरुंगातही गेले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी आपले प्रारंभिक शिक्षण ग्वाल्हेरमधून केले आणि नंतर ते कानपूरला गेले. दरम्यान, त्यांनी कानपूरच्या डीएव्ही कॉलेजमधून एलएलबी केलं. यावेळी अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांच्या वडिलांनी एलएलबीचे शिक्षण एकत्र घेतले होते आणि या काळात पिता-पुत्र दोघेही एकाच वसतिगृहाच्या खोलीत राहत होते. त्यानंतर पुढे ते राजकारणात आले.
अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधान पद भुषवलंय. होते. प्रथम 16 मे ते 1 जून 1996 म्हणजे केवळ 13 दिवस, 1998 मध्ये त्यानंतर 19 मार्च 1999 ते 22 मे 2004 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. ते हिंदी कवी, पत्रकार आणि प्रखर वक्ते होते.
[read_also content=”‘मास्क वापरा, हात धुवा’, आज वर्षाच्या शेवटच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन, ‘वाजपेयींचही केलं स्मरण https://www.navarashtra.com/india/use-mask-wash-hand-prime-minister-modis-public-appeal-in-todays-last-mann-ki-baat-program-nrps-356654.html”]
अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकार म्हणून केली. त्यांनी राष्ट्रधर्म, पांचजन्य आणि वीर अर्जुन यासाठी कमा केलं. जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेल्या परमिट पद्धतीला विरोध करण्यासाठी मुखर्जी श्रीनगरला गेले तेव्हा त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. परमिटची पद्धत मोडून तो श्रीनगरला गेले. यावेळी ते या घटनेचे वृत्ताकंन करण्यासाठी पत्रकार म्हणून तिथे उपस्थित होते.
त्यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, मुखर्जी यांना अटक झाली होती, पण मी परत आलो. या घटनेनंतर काही दिवसांनी डॉ. मुखर्जी यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतरच त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि देशाचे एक आदर्श पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या गेले.