तेलंगणाच्या राज्यपालांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय चर्चांना उधाण

तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सुंदरराजन यांनी सोमवारी सकाळी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवला.

    पुद्दुचेरी : तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सुंदरराजन यांनी सोमवारी सकाळी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांना पाठवला.

    तमिळनाडू भाजपाच्या माजी प्रदेशाध्यक्ष असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यासाठीच त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. भाजपच्या तिसऱ्या उमेदवारी यादीत तमिलीसाई सुंदरराजन यांचे नाव येऊ शकते. भाजपने दक्षिणेतील राज्यांमध्येही अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी मातब्बर उमेदवार रिंगणात उतरवले जात आहेत. त्यामुळे सुंदरराजन यांनाही राज्यपाल पदाचा राजीनामा देण्यास सांगितल्याची चर्चा आहे.

    2019 मध्ये त्यांनी दक्षिण तामिळनाडूतील थुथुकुडी मतदारसंघातून निवडणूक लढविली होती तथापि, या निवडणुकीत द्रमुकच्या कनिमोझी यांनी त्यांचा पराभव केला होता.