He Was Kept In The Mortuary Thinking He Was Dead When The Father Ran To Look For Him He Saw The Sons Trembling Hand Nrab
मृत समजून शवागारात ठेवले होते, वडील शोधायला धावले तेव्हा मुलाचा थरथरता हात दिसला अन..
घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्वांनी मिळून विश्वजीतचा शोध सुरू केला असता तो कुठेच सापडला नाही. थोड्या वेळाने सर्वांच्या आशा मावळल्या पण हिलाराम आपला मुलगा जिवंत असल्याचे सांगत होते.
ओडिशा रेल्वे अपघाताबाबत अनेक वेदनादायक कथा समोर आल्या आहेत. कुणाचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले, तर कुणाच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले. अनेक निष्पाप मुलं अनाथ झाले. जग बघण्याआधीच आई-वडिलांची सावली डोक्यावरून उठली. तर अपघातात असे ही काही लोक आहेत ज्यांनी गंभीर जखमी होऊन आयुष्याची सर्वात मोठी लढाई जिंकली आहे. या लोकांमध्ये 24 वर्षीय विश्वजित मलिकचाही समावेश आहे, जो वडिलांच्या आग्रहामुळे शवागारात गेल्यानंतरही वाचला.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, विश्वजीतचे वडील त्याला सोडवायला शालीमार स्टेशनवर आलेले. स्टेशनवर ते त्याच्यासोबत काहीवेळ कोरोमंडल एक्सप्रेसमध्ये बसून आले होते. मात्र, तेव्हा आपला मुलगा एवढ्या मोठ्या अपघाताला बळी पडेल आणि त्याला जीवाची बाजी लावावी लागेल याची कल्पनाही त्यांना नव्हती.
अवघ्या काही तासांनंतर जेव्हा विश्वजितचे वडील हिलाराम मलिक यांना रेल्वे अपघाताची बातमी मिळाली.तेव्हा त्यांच्यावर आभाळच कोसळले. हिलारामने मुलाला फोन लावला. सुदैवाने त्याने फोन उचलला. दुखापतीमुळे तो फार काही बोलू शकला नाही, मात्र विश्वासजीतला गंभीर दुखापत झाल्याचे त्याच्या वडिलांना समजले. यानंतर वडिलांनी ताबडतोब स्थानिक रुग्णवाहिका चालकाला बोलावले आणि मेव्हणा दीपक दाससह बालासोरला रवाना झाले. 230 किलोमीटरचा प्रवास करून ते बालासोरला पोहोचले.
मुलाचा शोध घेत शवागारात पोहचले
घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्वांनी मिळून विश्वजीतचा शोध सुरू केला असता तो कुठेच सापडला नाही. थोड्या वेळाने सर्वांच्या आशा मावळल्या पण हिलाराम आपला मुलगा जिवंत असल्याचे सांगत होते. घटनास्थळी मुलाची विचारपूस केल्यानंतर हिलाराम तात्पुरत्या शवागारात पोहोचले, जिथे प्राण गमावलेल्यांचे मृतदेह ठेवण्यात आले होते.
उजवा हात थरथरत होता
हिलाराम याना सुरुवातीला शवागारात आधी आत जाण्याची परवानगी मिळाली नाही, नंतर काही वेळाने कोणाची तरी नजर एका व्यक्तीवर पडली, ज्याचा उजवा हात थरथरत होता. हिलारामने हात पाहिल्यावर तो विश्वजीतसारखा दिसत होता. यानंतर विश्वजीतला तेथून तातडीने बाहेर काढून बालासोर येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.
दुखापत गंभीर होती, त्यामुळे डॉक्टरांनी त्याला कटक मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले. मात्र, बॉण्ड भरल्यानंतर वडील आणि काकांनी विश्वजीतला सोबत घेतले. त्याच्यासोबत एक रुग्णवाहिका होती. त्याच्यावर कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हात-पाय फ्रॅक्चरसह शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत.
Web Title: He was kept in the mortuary thinking he was dead when the father ran to look for him he saw the sons trembling hand nrab