तरुण मतदार ठरवणार बिहारचं राजकीय भविष्य? बिहारच्या राजकारणावर तरुणांचा किती प्रभाव? वाचा सविस्तर
बिहारमध्ये या वर्षअखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बिहार निवडणुकीबाबत मतदानपूर्व सर्वेक्षण किंवा जनमत चाचणी घेतली जात आहे. अलिकडेच झालेल्या इंकइन्साइट ओपिनियन पोलमध्ये असे दिसून आले आहे की बिहारच्या तरुण मतदारांचा कल एनडीएकडे असला तरी मुख्यमंत्री म्हणून आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना अधिक पसंती दिली जात आहे. १८ ते २९ वयोगटातील तरुणांपैकी सुमारे ४४.६ टक्के लोकांनी एनडीएला मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली, तर ३९.५ टक्के लोकांनी महाआघाडीला मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फक्त ०.७६ टक्के मतदारांचा जन सुराज्य पक्षाकडे कल असल्याचं दिसून आलं आहे.
मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांना पहिली पसंती आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आला तेव्हा तेजस्वी यादव यांनी युवा वर्गातील त्यांच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं आहे. या वयोगटातील सुमारे ४२ टक्के तरुणांनी तेजस्वी यादव यांना बिहारचे भावी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली. तर केवळ २७.७ टक्के तरुणांनी विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पाठिंबा दिला. २ टक्के मतदारांनी प्रशांत किशोर, ७ टक्के मतदारांना चिराग पासवान (लोजपा), १.६१ टक्के लोकांनी सम्राट चौधरी (भाजप मंत्री) यांना पसंती दिली, तर १३.३९ टक्के लोकांनी भाजपमधील नव्या चेहऱ्याला पसंती दर्शवली आहे.
वयोमानानुसार मतदारांची पसंती
३०-३९ वर्षे: तेजस्वी यादवला
४०-४९ वर्षे: नितीश कुमार
५०-५९ वर्षे: नितीश कुमार
६० वर्षांवरील: तेजस्वी यादव
या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की राजकीय आघाडीबाबत बिहारमधील तरुणांचा एनडीएकडे कल असला तरी, तेजस्वी यादव यांना नेते म्हणून प्राधान्य मिळत आहे. त्याच वेळी, मध्यमवयीन गट नितीश कुमारांशी जोडलेला दिसतो.
बिहार विधानसभा निवडणुकीत तरुण मतदारांचा सहभाग किती आहे?
बिहारच्या राजकारणात तरुण मतदारांची भूमिका महत्त्वाची बनली आहे. विशेषतः २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत, तरुण मतदारांच्या सक्रियतेने निवडणूक समीकरणे बदलण्यात मोठी भूमिका बजावली. निवडणूक आयोगाने जानेवारी २०२५ मध्ये फायनल मतदार यांदी जाहीर केली होती. त्यानुसार, बिहारमध्ये एकूण मतदारांची संख्या ७.८० कोटी आहे, त्यापैकी ४.०७ कोटी पुरुष मतदार, ३.७२ कोटी महिला मतदार आणि २१०४ तृतीयपंथी मतदार आहेत. नवीन मतदार यादीत ७ लाख ९४ हजार मतदारांची नावे जोडण्यात आली आणि ४ लाख नावे वगळण्यात आली.
निवडणूक आयोगाने म्हटले होते की बिहारमध्ये १८-१९ वयोगटातील सर्वात तरुण मतदारांची संख्या ८ लाख आहे, तर २०-२९ वयोगटातील मतदारांची संख्या ८ लाख आहे.
१.५५ कोटी मतदार आहेत, तर ३०-३९ वयोगटातील २.०४ कोटी मतदार आहेत आणि ४०-४९ वयोगटातील १.६९ कोटी मतदार आहेत.
२०२०-२०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत तरुण मतदारांचा सहभाग आणि त्यांचा प्रभाव
२०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत तरुण मतदारांची भूमिका निर्णायक होती. राज्यातील एकूण ७.१८ कोटी मतदारांपैकी सुमारे ५६% मतदार १८ ते ४० वयोगटातील होते, म्हणजेच सुमारे ४ कोटी मतदार, ज्यापैकी १८-२५ वयोगटातील मतदार राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या १६% होते.
२०२० च्या निवडणुकीत एकूण मतदान ५८.७% होते, जे २०१५ मध्ये ५६.९% होते. वयानुसार मतदानाचा डेटा उपलब्ध नसला तरी, तरुण मतदारांची मोठी संख्या आणि त्यांची निवडणूक सक्रियता पाहता, मतदान प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली हे स्पष्ट आहे.
PM Modi Speech : ‘आनंदी रहा, सुखाने भाकर खा, नाहीतर माझी गोळी आहेच…’: PM मोदींचा पाकिस्तानला इशारा
तरुण मतदार रोजगार, शिक्षण आणि विकास यासारख्या मुद्द्यांना प्राधान्य देतात. गेल्या निवडणुकीत तेजस्वी यादव सारख्या तरुण नेत्यांनी हे मुद्दे ठळकपणे मांडले होते, ज्यामुळे त्यांना तरुणांचा पाठिंबा मिळाला. एनडीएला बहुमत मिळाले असले तरी, आरजेडीला सर्वाधिक ७५ जागा मिळाल्या, ज्यामध्ये तरुणांच्या पाठिंब्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
२०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण मतदानाची टक्केवारी ५६.६६% होती. या निवडणुकीतही तरुणांचा कल महाआघाडीकडे (राजद, जेडीयू, काँग्रेस) दिसून आला, ज्यामध्ये तेजस्वी यादव सारख्या तरुण नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. २०१५ मध्ये महाआघाडीने मोठा विजय मिळवला होता – आरजेडीने ८० जागा जिंकल्या होत्या आणि जेडीयूने ७१ जागा जिंकल्या होत्या. यामध्ये तरुण मतदारांची निर्णायक भूमिका असल्याचे मानले जाते.