File Photo : Banke Bihar
लखनौ : जगप्रसिद्ध ठाकूर बांके बिहारी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीतून वाट काढणे देखील अवघड झाले होते. त्यातच या गर्दीच्या दबावामुळे हरियाणातील एका वृद्ध भाविकाचा मृत्यू झाला. या गर्दीत भाविकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली आहे.
हेदेखील वाचा : पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू: व्हिडीओ व्हायरल
सध्या या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. यामध्ये भाविकाचाच मृत्यू झाल्याने एकच चर्चा सुरु आहे. मंदिरात भाविकांच्या गर्दीचा प्रचंड ताण होता. फक्त मंदिर परिसर नाहीतर संपूर्ण शहरात पाय ठेवायला जागा उरली नाही. रक्षाबंधन आणि 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बांकेबिहारी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. रविवारी ठाकूर बांके बिहारीजींना भेटण्यासाठी आलेल्या हरियाणातील ममचंद सैनी या 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. गर्दीत गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गर्दीचा दबाव पडला अन् बेशुद्ध झाल्यानंतर…
दर्शनासाठी पोहोचल्यावर गर्दीच्या दबावाने तो बेशुद्ध पडला. त्यांना तातडीने वृंदावन जिल्हा संयुक्त रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी भक्ताला मृत घोषित केले. रुग्णालयाचे आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात येण्यापूर्वीच भक्ताचा मृत्यू झाला होता.
हेदेखील वाचा : वेळ आली पण काळ आला नव्हता; ओढ्यात वाहून गेलेले दोघेजण प्रसंगावधानामुळे बचावले