नवी दिल्ली : घरात कौटुंबिक वाद झाल्यास रागात व्यक्ती काय करेल हे सांगता येत नाही. नवी दिल्लीत पती-पत्नी मध्ये वाद झाल्यानं सतांपलेल्या पतीनं पत्नी, सासूसह 8 वर्षाच्या मुलीवर चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपी सिद्धार्थ शर्मा हा गुरुग्राममधील एका कंपनीत इंजिनिअर आहे.
[read_also content=”महिलेने २६ वर्षीय प्रियकराची चालत्या रिक्षातच केली हत्या https://www.navarashtra.com/maharashtra/woman-killed-boyfriend-in-mumbai-she-surrender-in-front-of-police-after-murder-320313.html”]
दिल्लीतील हायप्रोफाईल परिसरात या इंजिनिअरने घरात वाद झाल्यानंतर पत्नी, सासू आणि मुलीवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात तिघीही जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र तिघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर आदिती शर्मा (35) आणि माया देवी (60) अश जखमी महिलांची नावे आहेत. पती पत्नीमध्ये यापुर्वीही वाद झाले असून त्यांनी एकमेकांविरुद्ध न्यायालयात अनेक खटले दाखल केल्याची माहिती आहे.
[read_also content=”कोण आहे बारामतीचा ॲग्रो ‘गबरू’ जवान? मोहित कंबोज यांच्या नव्या ट्वीटमुळं चर्चांना उधाण https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-mohit-kamboj-new-tweet-baramati-agrow-gabaru-jawan-320302.html”]