नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याला तिन वर्ष झाले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केले. त्यावेळी अनेक विरोधी नेत्यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले होते. राहुल गांधी यांनीही सरकारला पुरावे देण्यास सांगितले होते. याप्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना प्रश्न विचारला असता त्यांनीही राहुल गांधींचे समर्थन करत यात गैर काय आहे, असे सांगितले.
केसीआर म्हणाले, ‘सरकारने सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे द्यावेत, अशी माझीही मागणी आहे. राहुल गांधी हे खासदार आहेत आणि सरकारला प्रश्न विचारू शकतात.
केसीआरच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, ‘तेलंगणाचे मुख्यमंत्री खूप निराश आहेत. हुजूराबादमधील सर्जिकल स्ट्राईकनंतर हुजूरांच्या बोलण्याला तडा गेल्याचे दिसते. निवडणूक हरल्यानंतर ही स्थिती आहे. तेलंगणात टीआरएस बुडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानबाबत टीआरएस आणि काँग्रेसचे विचार समान आहेत. जेव्हा-जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ते नवनवीन प्रयत्न करतात. मग तो हिजाब असो वा पाकिस्तान. भाजप केवळ विकासाचे राजकारण करते.
On the anniversary of the Pulwama attack -Opposition has chosen to insult our martyrs by again questioning the surgical strike
KCR &Cong is in competition to prove their loyalty to the Gandhi family
Our loyalty is with Bharat.Those questioning the armed forces won’t be spared pic.twitter.com/XgaJR3wt5a
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) February 14, 2022
केसीआरच्या वक्तव्यावर हेमंत बिस्वसरमा म्हणाले, गांधी परिवार केवळ पुरावे मागून लष्कराची फसवणूक करत आहे. मी सैन्यासोबत आहे आणि आयुष्यभर मला शिव्या देत राहायचे असेल तर काही फरक पडत नाही. सरमा म्हणाले होते, ‘राजीव गांधी यांचा मुलगा आहे की नाही याचा पुरावा राहुल गांधींकडे कोणी का विचारत नाही?’ यावर विरोधी पक्षनेत्यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.