ग्वाल्हेर : एका महिलेने तुरुंग प्रशासनाकडे (Application to Jail Administration) अर्ज दाखल केला आहे. या अर्जाद्वारे तिने तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पतीची पॅरोलवर सुटका (Parol Bail) करावी, अशी मागणी केली आहे. मला मूल हवे आहे, त्यामुळे पतीला पॅरोलवर बाहेर सोडा, अशी मागणी महिलेने अर्जाद्वारे केली. आता या अर्जाची एकच चर्चा सुरु आहे.
ग्वाल्हेर येथे राहणाऱ्या महिलेचा पती गेल्या सात वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. शिवपुरी येथील रहिवासी असलेल्या कुटुंबाने ग्वाल्हेर तुरुंग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी ग्वाल्हेर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या दारा सिंह जाटव नावाच्या व्यक्तीला पॅरोलवर सोडण्यात यावे, अशी मागणी केली. दारा सिंह याला लग्नानंतर लगेचच एका खुनाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो ग्वाल्हेर तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
दरम्यान, कैद्याचे वडील करीम सिंह जाटव यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी जेव्हा त्यांच्या मुलाला (दारा सिंह जाटव) अटक केली, तेव्हा त्यांचे कुटुंब लग्नाचा उत्सवही साजरा करू शकले नव्हते. त्यांच्या आजारी पत्नीला एक नातू हवा आहे. त्यामुळे आता त्यांच्या सूनेने पतीला तुरुंगातून सोडण्याची विनंती करणारा अर्ज दिला आहे.






