रांची : झारखंडमधील रांचीमध्ये 9 ठिकाणी ‘ईडी’ने छापे टाकून मोठी रोकड जप्त केली. झारखंडचे ग्रामीण विकासमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर आलम यांचा स्वीय सचिव संजीव लाल यांचा नोकर जहांगीर, पीएसचा जवळचा ठेकेदार मुन्ना सिंह, रस्ते बांधकाम विभागाचे अभियंता विकास कुमार आणि कुलदीप मिंज यांच्या घरांवर सोमवारी छापे टाकण्यात आले. याशिवाय आणखी तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले.
जहांगीरच्या घरातून ईडीने आतापर्यंत सुमारे 30 कोटी रुपये जप्त केले आहेत. बँक अधिकारी नोटा मोजण्याचे यंत्र घेऊन येथे पोहोचले. पीएस यांच्या जवळचा असलेल्या मुन्नाच्या ठिकाणाहून 3 कोटी जप्त करण्यात आले. अशाप्रकारे आतापर्यंतची एकूण वसुली (30+3) 33 कोटी रुपये झाली आहे.
सहा मशिन्समधून सतत मोजणी रोख मोजणीचे काम सकाळपासून संध्याकाळपर्यंत 6 मशिन्सच्या साहाय्याने सुरू होते. 33 कोटी रुपये मोजले गेले होते. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडल शिल्लक आहेत. ज्यांची मोजणी झालेली नाही. अंतिम आकडा 40 ते 50 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
सततच्या कामामुळे काही मशिन्समध्येच बिघडल्या. त्यांच्या जागी नवीन मशीन बसवण्यात आल्या. छाप्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची रोख मोजणी आणि हिशेबात ईडी आणि बँक अधिकाऱ्यांना मेहनत घ्यावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.