नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone) धोका वाढताना दिसत आहे. या चक्रीवादळामुळे मोठा फटकाही बसत आहे. त्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून रस्त्यावर (Heavy Loss due to Biparjoy Cyclone) पडली आहेत. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा वाहतुकीवर परिणाम झाला. बिपरजॉयला सामोरे जाण्यासाठी सरकारने सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
बिपरजॉय का ज्यादा मजाक बनाने से पहले उसकी ताकत देख लीजिए
दृश्य गुजरात के द्वारका का है।#बिपरजॉय #BiparjoyUpdate pic.twitter.com/hdanl6IRPK — Arvind Chotia (@arvindchotia) June 15, 2023
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील 8 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, 9 राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार आहे. चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता प्रशासन सज्ज झाले असून, एसडीआरएफ, एनडीआरएफ, कोस्टगार्डसह लष्करही तैनात करण्यात आले आहे. अरबी समुद्रातून निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडे सरकत आहे. बिपरजॉयचा प्रभाव गुजरातमध्ये दिसत आहे. या चक्रीवादळामुळे समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. त्याचा परिणाम राज्यातील अनेक भागात दिसून येत आहे.
#बिपरजॉय तस्वीर 3 pic.twitter.com/DyVgc8m91x — Dr.Ahtesham Siddiqui (@AhteshamFIN) June 15, 2023
अनेक भागांत जोरदार पाऊस
बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, एनडीआरएफच्या 18 आणि एसडीआरएफच्या 12 तुकड्या जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.
जोरदार वारे अन् मुसळधार पाऊस
हे चक्रीवादळ पोरबंदरपासून दूर सरकले आहे. मात्र, देवभूमी द्वारका आणि कच्छच्या किनारी भागाकडे सरकत आहे. त्यामुळे काही ठिकाणी जोरदार वारे वाहत आहेत तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. 12 हजारांहून अधिक विजेचे खांब कोसळले आहेत. यामुळे अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.
जखाऊ बंदरात नुकसान
बिपरजॉय चक्रीवादळाच्या तडाख्यापूर्वी कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरात मच्छिमार वसाहतीचे नुकसान झाले. चक्रीवादळ बिपरजॉयमुळे बुधवारी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मांडवी समुद्रकिनारी समुद्रात जोरदार वारे आणि उंच लाटा उसळल्या होत्या. गुजरातमध्ये आतापर्यंत 47 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.






