Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Nuclear Weapons : भारताने बदलले संरक्षण धोरण! सीमेवर १२ अण्वस्त्रे तैनात, चीन-पाकिस्तानसाठी इशारा?

India Nuclear Weapons : भारताच्या संरक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण वळण आले आहे. भारताने प्रथमच १२ अण्वस्त्रे तैैनात केली आहे. यामुळे पाकिस्तान आणि चीनच्या चिंतेत भर झाली आहे. भारताच्या अण्वस्त्रांची संख्या आता १९० वर पोहोचली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 10, 2026 | 11:50 AM
India deployes 12 nuclear warheads

India deployes 12 nuclear warheads

Follow Us
Follow Us:
  • भारताच्या संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण हालचाल
  • प्रथमच तैनात केली १२ अण्वस्त्रे
  • पाकिस्तान-चीनच्या चिंतेत भर
India Nuclear Weapons News in Marathi : भारताच्या संरक्षण धोरणात महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळाला आहे. भारताने प्रथमच १२ अण्वस्त्रे सैन्यासह तैनात केली आहे. पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवरील वाढत्या हलाचालींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी भारताकडे १८० अण्वस्त्रे असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. मात्र, आता भारताकडे १९० अण्वस्त्रे आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशन पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सीप्री) इयरबुक २०२६ अहवालात याचा खुलासा केला आहे.

SU-57 Deal : आता पाकिस्तानची खैर नाही! भारताला रशियाची ‘सुपरपॉवर’ ऑफर; चीनचीही उडाली झोप

काय सांगतो अहवाल?

सीप्रीच्या अहवालानुसार, जानेवारी २०२६ पर्यंत भारताच्या अण्वस्त्रांची संख्या १९० वर पोहोचली आहे, गेल्या वर्षी ही संख्या १८० होती. यातील १२ अण्वस्त्रे भारताने तैनात केली आहेत. अहवालानुसार, भारताने एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीवरही काही अण्वस्त्रे तैनात करण्यास सुरुवात केली आहे. भारता आता थेट समुद्रातून शत्रूंवर हल्ला करण्यास सक्षम आहे. मात्र, ही बाब पाकिस्तान आणि चीनसाठी चिंताजनक ठरत आहे.

रिपोर्टनुसार, भारताडके आपले आण्विक वॉरहेड आणि त्यांना वाहून नेणारी सिस्टमी वेगवेळे ठेवतो असे सांगण्यात आले होते. परंतु यावेळी भारताने सर्व शस्त्रे संपूर्णपणे सुसज्ज ठेवली आहेत. रिपोर्टनुसार, भारता आतापर्यंत केवळ स्टॉकपाइलच्या स्वरुपात अण्वस्त्रे ठेवायचा पण पहिल्यांदाच भारताने ही तैनात केली आहेत. यामुळे भारत आपल्या संरक्षण धोरणात मोठा रणनीतिक बदल करत असल्याचे मानले जात आहे.

धोरणात्मक महत्त्व

तज्ज्ञांच्या मते, भारताच्या अण्वस्त्र क्षमतेत वाढ करण्याचा उद्देश शस्त्रास्त्र स्पर्धा नसून संभाव्य शत्रूंच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी आणि देशाचे रक्षण करण्यासाठी आहे. भारताचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आणि धोरणात्मक पाऊल मानले जात आहे. परंतु सध्या अनेक देशांमध्ये अण्वस्त्र स्पर्धेत मोठी वाढ झाली आहे.

इतर देशांची स्थिती

सध्या पाकिस्तानच्या अण्वस्त्रे क्षमतेत कोणतीही वाढ झालेली नसून त्यांच्याकडे १७० अणूबॉम्ब आहेत. अण्वस्त्र क्षमतांच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. तर त्यानंतर चीनचा नंबर लागतो. याशिवाय ब्रिटन, रशिया, इस्रायल आणि उत्तर कोरियाने देखील अण्वस्त्रांवर मिलियन डॉलर खर्च केला आहे. रिपोर्टनुसार, सध्या जगभरातील अण्वस्त्र साठा २०२६ पर्यंत १२,१८७ वॉरहेडवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी ही संख्या १२,२४१ इतकी होती.

India Australia Defense : भारताच्या लढाऊ विमानांचे रक्षण करणार ‘Ghost’ ड्रोन; ऑस्ट्रेलियासोबत संरक्षण करारावर महत्त्वपूर्ण चर्चा

Web Title: India deployed 12 nuclear warheads warning to china pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Indian Air Force
  • Marathi News
  • Nuclear missiles

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे
3

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
4

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.