पाकिस्तानची मुजोरी, भारताने परतवला हल्ला
रात्रीच्या अंधारात पाकिस्तानने पुन्हा एकदा भ्याड हल्ला केला आहे. गुरुवारी रात्री जम्मू, पंजाब आणि राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले. एस-४०० आणि ‘आकाश’ सारख्या सतर्क हवाई संरक्षण प्रणालींनी प्रत्येक हल्ला हाणून पाडला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ताज्या घडामोडींची माहिती दिली. पंतप्रधान सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सिंह यांनी सीडीएस जनरल अनिल चौहान आणि तिन्ही लष्कर प्रमुखांशीही चर्चा केली आहे.
जम्मूमधील सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे पाकिस्तानकडून ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्या सर्वांना भारतीय हवाई संरक्षण दलाने हवेतच रोखले. घटनास्थळावरून समोर आलेले दृश्ये हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांसारखीच आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की पाकिस्तानचे सैन्य आता दहशतवादी संघटनेसारखे वागत आहे. लक्षात ठेवा की गेल्या महिन्यात पीओकेमध्ये आयएसआय आणि हमास यांच्यात एक बैठकही झाली होती.
बुधवार-गुरुवार रात्री पाकिस्तानने या भागांना लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता. कर्नल सोफिया कुरेशी यांनी गुरुवारी संध्याकाळी सांगितले की, ज्या शहरांना लक्ष्य करण्यात आले त्यात अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यांचा समावेश आहे. सापडलेल्या ढिगाऱ्यांवरून हे हल्ले पाकिस्तानी हद्दीतून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
08 May 2025 11:56 PM (IST)
स्पाइसजेटने प्रवास सल्ला जारी केला आहे. एअरलाइनने ट्विट केले आहे की, 'सर्व विमानतळांवरील वाढीव सुरक्षा उपाय लक्षात घेता, प्रवाशांना चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी प्रस्थानाच्या किमान ३ तास आधी विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.'
#TravelUpdate: In light of enhanced security measures across all airports, passengers are advised to arrive at the airport at least 3 hours prior to departure to ensure a smooth check-in and boarding process.
— SpiceJet (@flyspicejet) May 8, 2025
08 May 2025 11:51 PM (IST)
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीरमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे ९ आणि १० मे रोजी बंद राहतील, अशी माहिती जम्मू काश्मीरच्या शिक्षण विभागाने दिली आहे.
08 May 2025 11:48 PM (IST)
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये भारताने पाकिस्तानी पायलटला जिवंत पकडले आहे. यबाबत गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी पुष्टी केली. भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली आहेत.
08 May 2025 11:47 PM (IST)
भारतीय सैन्याने देखील पाकिस्तानवर हल्ला करण्यात आला आहे. भारतीय सैन्य, नेव्ही आणि एअरफोर्स तिन्ही सतर्क झाले असून तिन्ही दलांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे.
08 May 2025 11:45 PM (IST)
भारत पाकिस्तान युद्ध सुरु झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीमधील इंडिया गेट बंद करण्यात येत आहे. पोलिसांकडून इंडिया गेट परिसर रिकामा करण्यात येत आहे.
08 May 2025 11:43 PM (IST)
भारत आणि पाकिस्तानचे युद्ध सुरु झाले आहे. यामध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या आणि इटलीच्या देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला आहे. त्यांनी भारताला पाठिंबा दिला असल्याचे ऑफिशियल अकाऊंटवरुन सांगण्यात आले आहे.
Spoke with US @SecRubio this evening.
Deeply appreciate US commitment to work with India in the fight against terrorism.
Underlined India’s targeted and measured response to cross-border terrorism. Will firmly counter any attempts at escalation.
🇮🇳 🇺🇸
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 8, 2025
08 May 2025 11:40 PM (IST)
शुक्रवारी रात्री ८:२० नंतर, पाकिस्तानकडून जम्मू, उधमपूर, राजौरी, पठाणकोट, सांबा आणि अखनूर येथे सुमारे ५०-६० हवाई हल्ले झाले, जे भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पूर्णपणे हाणून पाडले. जम्मू-काश्मीरचे माजी डीजीपी एसपी वैद म्हणाले, 'एवढा मोठा हल्ला होऊनही कोणतेही नुकसान झाले नाही, ही आपल्या अजिंक्य हवाई संरक्षण यंत्रणेची ताकद आहे.' त्यांनी पाकिस्तानकडून पूर्ण युद्धाचे वर्णन केले आणि म्हणाले, 'आता तिन्ही सैन्यांनी योग्य उत्तर देण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानचे दिवस आता मोजले गेले आहेत. लवकरच ते पाच भागात विभागले जाईल. पाकिस्तानने आता दहशतवादाची मर्यादा ओलांडली आहे आणि भारताने आता निर्णायक कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले.
08 May 2025 11:26 PM (IST)
अकासा एअरने प्रवाशांसाठी एक सूचना जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की, 'भारतातील सर्व विमानतळांवर वाढलेल्या सुरक्षा उपायांमुळे, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही निर्बाध चेक-इन आणि बोर्डिंग सुनिश्चित करण्यासाठी प्रस्थानाच्या किमान 3 तास आधी विमानतळावर पोहोचा. विमानतळावर प्रवेश करण्यासाठी कृपया तुमच्याकडे सरकार-मान्यताप्राप्त फोटो ओळखपत्र असल्याची खात्री करा. तुमच्या चेक-इन बॅगेज व्यतिरिक्त, फक्त ७ किलो वजनाची एकच हँडबॅग नेण्याची परवानगी असेल. नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व प्रवाशांना विमानात चढण्यापूर्वी दुय्यम सुरक्षा तपासणी करावी लागेल...’
08 May 2025 11:18 PM (IST)
सोशल मीडियावर पसरणाऱ्या खोट्या बातम्यांबद्दल लष्कराने इशारा दिला आहे. पीआयबीच्या मते, जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथे लष्कराच्या ब्रिगेडवर 'फिदायीन' हल्ला झाल्याच्या बातम्या पसरत आहेत परंतु असा कोणताही हल्ला झालेला नाही. अशा खोट्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका असे भारतीय सेनेने सांगितले आहे.
🚨 #Fake_news is circulating about a "fidayeen" attack on an Army brigade in #Rajouri, #Jammu and #Kashmir.#PIBFactCheck:
▶️ No such #fidayeen or suicide attack has occurred on any army cantt.
⚠️ Do not fall for these false claims intended to #mislead and cause confusion. pic.twitter.com/x8Az5tigUO
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 8, 2025
08 May 2025 11:16 PM (IST)
1971 च्या युद्धानंतर आता पुन्हा एकदा INS विक्रांत पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. पाकिस्तानच्या कराची बंदरावर INS विक्रांतच्या माध्यामातून नौदलाने हल्ले सुरु केले आहेत. कराची बंदरावर पाकिस्तानवर हल्ला करण्यास आता नौदलाने देखील सुरुवात केली आहे. कराची बंदरावर 10 पेक्षा जास्त स्फोटांचे आवाज येत असल्याचं स्पष्ट झालं आहे. लष्कर , वायुदल आणि नौदल या तिन्ही सुरक्षा दलाने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले आहेत.
08 May 2025 11:10 PM (IST)
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांमुळे कोणतेही नुकसान झालेले नाही, असे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले. "ऑन एक्स" या निवेदनात म्हटले आहे की, "जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर आज पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांना लक्ष्य केले. स्थापित मानक कार्यपद्धती (एसओपी) नुसार गतिज आणि नॉन-गतिज क्षमतांचा वापर करून धोक्यांना त्वरित निष्क्रिय करण्यात आले. कोणत्याही जीवितहानी किंवा भौतिक नुकसानीचे वृत्त नाही. भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे."
Military stations at Jammu, Pathankot & Udhampur were targeted by Pakistani-origin #drones and missiles along the International Border in J&K today.
The threats were swiftly neutralised using kinetic and non-kinetic capabilities in line with established Standard Operating…
— PRO Defence Jammu (@prodefencejammu) May 8, 2025
08 May 2025 11:05 PM (IST)
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) ने देशभरातील सर्व विमान कंपन्या आणि विमानतळांना सुरक्षा वाढवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. सर्व विमानतळांवर सर्व प्रवाशांची दुय्यम तपासणी केली जाईल. टर्मिनल इमारतीत पर्यटकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. विमानात एअर मार्शल तैनात केले जातील असेही सांगण्यात आले आहे.
08 May 2025 11:04 PM (IST)
एअर इंडियाने X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (BCAS) च्या नवीन आदेशानुसार, सर्व प्रवाशांना चेक-इन आणि बोर्डिंगमध्ये कोणताही त्रास टाळण्यासाठी त्यांच्या उड्डाण सुटण्याच्या वेळेच्या किमान तीन तास आधी विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.' टीप: फ्लाइट सुटण्याच्या ७५ मिनिटे आधी चेक-इन बंद होईल.
In view of an order by the Bureau of Civil Aviation Security on enhanced measures at airports, passengers across India are advised to arrive at their respective airports at least three hours prior to scheduled departure to ensure smooth check-in and boarding.…
— Air India (@airindia) May 8, 2025
08 May 2025 10:58 PM (IST)
भारताने लाहोरवर ड्रोनने मोठा हल्ला केला आहे. याआधी पाकिस्तानने जम्मू, राजस्थान, पंजाब, गुजरात इत्यादी ठिकाणी क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. तथापि, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे क्षेपणास्त्र हवेतच पाडले. पाकिस्तानचे धाबे दणाणून टाकणारी कारवाई भारताने केली सुरू
08 May 2025 10:55 PM (IST)
पाकिस्तानवर प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरूच आहेत. लाहोरपासून सियालकोट आणि अगदी इस्लामाबादपर्यंत भारताने ड्रोन हल्ले केले. दरम्यान, भारत सरकारने मोठी कारवाई करत कंपनीला ८,००० एक्स अकाउंट्स बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. नुकतीच ही मोठी बातमी बाहेर आल्याचे सांगण्यात येत आहे. भारताने पाकिस्तानच्या कारवाया रोखण्यसाठी ठोस पावलं उचलायला सुरूवात केलीये
08 May 2025 10:54 PM (IST)
भारताने केवळ सियालकोट आणि लाहोरवरच नव्हे तर इस्लामाबादवरही हल्ला केला आहे. ताज्या माहितीनुसार, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही लक्ष्यित हल्ला करण्यात आला. भारताने यावेळी ठोस भूमिका घेत पाकिस्तानचा प्रत्येक डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न केलाय
08 May 2025 10:52 PM (IST)
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अलिकडच्या घडामोडींबाबत युरोपियन युनियन (EU) च्या परराष्ट्र व्यवहार प्रतिनिधी काजा कल्लास यांच्याशी चर्चा केली. कोणत्याही चिथावणीला कडक प्रत्युत्तर दिले जाईल, असे भारताने युरोपियन युनियनला सांगितले. जयशंकर यांनी इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली.
08 May 2025 10:39 PM (IST)
हल्लाच्या पार्श्वभूमीवर सीमालगत भागातील असे एकूण 27 विमानतळं बंद राहणार आहे. यात पंजाब, काश्मीर येथील विमानतळांचा समावेश आहे. श्रीनगर, लुधियााना, चंदीगढ, गुजरात, येथील विमानसेना बंद करण्यात आली आहे
08 May 2025 10:34 PM (IST)
पाकिस्तानला एकामागून एक धक्के बसत आहेत. गुरुवारी रात्री त्याने पुन्हा काहीतरी करण्याचे धाडस केले. सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले करण्यात आले जे पूर्णपणे निष्क्रिय करण्यात आले. भारताने पाकिस्तानची दोन महागडी लढाऊ विमानेही पाडली. भारताने चीनकडून मिळालेले जेएफ-१७ आणि अमेरिकेकडून घेतलेले एफ-१६ विमान नष्ट केले आहेत.
08 May 2025 10:31 PM (IST)
India Pakistan War News LIVE: भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आहे. वृत्तानुसार, सियालकोट आणि लाहोरवर हल्ले करण्यात आले आहेत. भारताने लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली दिवसाढवळ्या नष्ट केली आहे.
08 May 2025 10:29 PM (IST)
गुरुवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या अयशस्वी हल्ल्याच्या प्रयत्नानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण प्रमुख (CDS) जनरल अनिल चौहान यांच्याशी चर्चा केली आहे. सिंह यांनी तिन्ही लष्कर प्रमुखांकडूनही अपडेट्स घेतले. याआधीही भारताने पाकिस्तानकडून येणारे अनेक रॉकेट नष्ट केले होते. पाकिस्तानने भारतातील १५ शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय सैन्याने सर्व हल्ले हाणून पाडले.
08 May 2025 10:28 PM (IST)
भारताने पाकिस्तान हवाई दलाचे (PAF) मौल्यवान JF-17 लढाऊ विमान पाडले आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानने उत्तर सीमेवर हल्ले केले तेव्हा हे JF-17 देखील कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानची ८ क्षेपणास्त्रेही पाडली आहेत. पूर्ण तयारीनिशी भारताने आता कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे